Breaking
आरोग्य व शिक्षणकवितानागपूरपरीक्षण लेखभंडारामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

मराठीचे शिलेदार समूहाप्रती आभाराची शब्दसुमने; वनिता गभने

वैदर्भीय कवयित्री, लेखिका भंडारा

0 4 8 2 9 4

मराठीचे शिलेदार समूहाप्रती आभाराची शब्दसुमने; वनिता गभने

वैदर्भीय कवयित्री, लेखिका भंडारा

जाता जाता बाप्पा तू तर
कमाल करून गेलास..
दोनच दिवसात पुन्हा
सर्वोत्कृष्ट देऊन गेलास..!

आज सकाळी जेव्हा मी सरांचा, ‘फोटो पाठवा’ मेसेज बघातला, तेव्हा मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. कारण दोनच दिवसांपूर्वी सरांचा हाच मेसेज होता. आश्चर्याचा एवढा मोठा सुखद धक्का..!! खरेच, बाप्पाच पावले मला..!

‘बालकविता’ म्हणजे बालवाडी काव्य. त्यात मार्मिकता, तात्विकता, गहनता काहीही नसते फक्त असते ती निरागसता. म्हणूनच कदाचित ते या बालवाडीला ठिकठिक जमत असावे.

खरे बघता माझा जन्म संयुक्त कुटुंबातील असल्यामुळे वयाच्या पंधरा सोळाव्या वर्षापर्यंत कर्तव्य, जबाबदारी, काम या शब्दांशी माझा दूरदूर पर्यंत संबध नव्हताच. शाळा, खेळ आणि थोडाफार अभ्यास एवढेच काय ते माझे जीवन. यावरून एक प्रसंग मला आठवतो, मी ज्या शाळेत शिकले त्याच शाळेतील एक शिक्षक आमच्याकडे भाडेकरू होते. माझ्या बालिशपणाला, खेळवड वृत्तीला कंटाळून एक दिवस माझे वडील गुरुजींना बोलले , “ही एकही अभ्यास करत नाही दिवसभर खेळत बसते, हिला नापास करा हो.” त्यावर गुरुजी बोलले, ” दरवर्षी वर्गात पहिलीच असते ती, नापास कसे करणार? ” सांगायचे तात्पर्य एवढेच की, बालपणीचा तो बालिशपणा, खट्याळपणा कुठेतरी सुप्त अवस्थेत माझ्यात जीवंत होताच. त्याला जागृत करून चेतना दिली ते आदरणीय राहुल सरांनी.!

सरांनी ‘आम्ही बालकवी’ हा समूह सुरू करून जणू काही बालविश्व खुले केले. यासाठी मी आजन्म सरांच्या ऋणात आहे. सरांचे आणि सोबतच सविता ताईसोचे कार्य खूप महान आहे. यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडणे खरेच खूप खूप कठीण आहे. नोकरी घर व समूहाचा एवढा मोठा व्याप..! एवढा मोठा यासाठी कारण की, मी फक्त चारपाच समूहात वाचते आणि थोडेफार लिहते तरीसुद्धा माझा दिवस भुर्रकन उडून जातो. मला कळत नाही सरांना दिवस कसा काय पुरतो..?
असा हा व्याप सांभाळून सर्वांच्या आनंदासाठी, लेखणीच्या सन्मानासाठी प्रोत्साहनपर स्पर्धा घेतल्या जातात. पण खंत एकच की, वारंवार फोटोची मागणी करूनही शिलेदार ताई दादा फोटोच पाठवत नाही..! इथे सर्वच विद्याविभूषित, पदवीधर, उच्चशिक्षित आहेत. मी बालवाडीने जास्त बोलणे उचीत नाही. पण आदरणीय राहुल सरांची तळमळ बघता या गोष्टीवर गांभीर्याने विचार व्हावा हीच विनंती. चूक भूल क्षमा असावी.

आज माझ्या बालकाव्याला सर्वोत्कृष्टच्या पोस्टरवर सन्मानित करून गौरवण्यात आल्याबद्दल समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहल सर, आदरणीय सविता ताईसो, सहप्रशासक आ. वैशाली ताईसो, आ. स्वाती ताईसो, आ. तारका ताईसो, आ. सुधा ताईसो, आ. शर्मिला ताईसो, आ. वृंदा ताईसो, आ पल्लवी ताईसो, आ. प्रतिभा ताईसो, आदरणीय विष्णू दादा, आ. उरकुडे सर, आ. कुमठेकर सर, आ. लांडगे सर सर्व सहप्रशासक, परिक्षकांची मी खूप खूप ऋणी आहे. समूहातील सर्व ताई दादा जे नेहमीच मला प्रोत्साहन देऊन लेखणीला बळ देतात त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते.!

सौ वनिता गभणे, आसगाव भंडारा

सदस्या मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे