Breaking
आरोग्य व शिक्षणकविताक्रिडा व मनोरंजनदादरा नगर हवेलीनाशिकपरीक्षण लेखमहाराष्ट्रसाहित्यगंध

आभारीय शब्दसुमनांजली, अंतर्मनाला नवी झळाळी; सुजाता सोनवणे

कवयित्री, लेखिका, शिक्षिका, सिलवासा

0 4 8 2 9 7

आभारीय शब्दसुमनांजली, अंतर्मनाला नवी झळाळी; सुजाता सोनवणे

कवयित्री, लेखिका, शिक्षिका, सिलवासा

बहरली माझी लेखणी
शब्दप्रभूंच्या सानिध्यात
शब्दांनीच जोडली नाती
सुखावली मी अंतरात.”

“मराठीचे शिलेदार” समूहाच्या उपक्रमांतर्गत आज माझ्या ‘हायकू’ काव्याला सर्वोत्कृष्टचा सन्मान देऊन लेखणीला गौरविण्यात आले. याबद्दल सर्वप्रथम समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहूल सर,सौ.पल्लवीताई यांची मी शाश्वत ऋणी.मुख्य प्रशासक परीक्षक वंदनीय सवूताई,सहप्रशासक वैशूताई, स्वातीताई, सुधाताई, तारकाताई, वृंदाताई सहप्रशासक व संकलक मा.श्री.अरविंद सर,अशोकदादा, ज्येष्ठ कवी व परीक्षक विष्णू दादा, हायकू तज्ञ हंसराज दादा,संग्रामदादा समूहातील सर्व प्रेरक ताई दादा सर्वांचे अंत:करणपूर्वक खूप खूप धन्यवाद.

हायकू चित्रानुरूप एक कुटुंबाची जबाबदारी असणारी नारी लहान बाळाला पाळण्यात झोपवून सोबत आईला खेळणी बनवण्यात हातभार लावणारी लेक. अतिशय भावस्पर्शी चित्र पाहून आपसुकच खूप सारे हायकू स्फुरले त्यातली एक रचना मा.परीक्षकांना भावली अन् सर्वोत्कृष्ट पोस्टरवर झळकली. परीक्षकांचे खूप खूप धन्यवाद.????

आ.सर नेहमीच सर्व काव्यप्रकारात मन बुद्धी विचारांना चालना देणारे नवनवीन अर्थपूर्ण विषय देत असतात. सध्या लेखनात माझे सातत्य नाही कारणही तशीच तारेवरची कसरत तशी रोजचीच त्यातच सासुबाईंचं आजारपण इतर व्याप..असो..तरीही हायकू पाच सात पाचचा आकृतीबंध बारा अक्षरे लवकर होतो म्हणून सहसा हायकू चारोळी करते मी पण काव्यलेखन सध्या काही जमतं नाही आणि शब्दही रूसलेत माझ्यावर..पण आज कमाल खूप दिवसांनंतर सर्वोत्कृष्टचा शिरपेचात मानाचा तुरा रोवला आणि आज चक्क बालकाव्य आणि अजून एक कविताही लिहिलीय मी.मा.परीक्षकांचे सहृदय आभार.

आज माझ्या हायकू रचनेची निवड पाहून मनविभोर झाली. खरचं मनावरचा ताण निवळला. वास्तविक पाहता ‘मराठीचे शिलेदार’ समूहातच सर्व शब्दप्रभूंच्या सहवासात माझी लेखणी बहरली.कवीमनाला कलाटणी देणारे नवनवीन विषय सातत्याने समूहात देणारे, माय मराठीच्या सक्षमीकरणासाठी अहोरात्र कार्यतत्पर असणारे, नाविन्यपूर्ण उपक्रमातून ज्ञानामृताचा झरा अविरत वाहत ठेवणारे आदरणीय राहूल सरांच्या अलौकिक अजोड कर्तृत्वाला शाश्वत नमन. सोबतच समस्त प्रशासकीय टीमचे योगदान अतुलनीयच.

फक्त थोडे काही..शब्दप्रभू ताई दादांनो. “मराठी भाषा सक्षमीकरणासाठी दिनरात राबतात प्रशासकीय हात जाणीव हवी प्रत्येक सदस्याला विवेकबुद्धीने द्यावी समूहाला साथ.” आपण किमान त्या स्पर्धेचा निकाल वेळेत न पाहता. फोटो मागणी केलेली असूनही फोटो न पाठवता. एक प्रकारे समूहाविषयी अनास्थाच दर्शवितो..खेदाचीच बाब. पुढयात आलेला सन्मानाला मला नाही वाटत कुणी अवहेलणार..(मी मात्र याबाबत सदैवच दक्ष. पण लेखनात सातत्यता नाही हीच खेदाची बाब )त्यामुळे जरा आपला अमूल्य वेळ,समूहाचे नियम काळजीपूर्वक वाचून समूहाला साथ द्यावी हीच आशा.अतिशयोक्ती झाल्यास क्षमा असावी. पुनश्च सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.

सौ.सुजाता सोनवणे.
सिलवासा दादरा नगर हवेली.
सदस्या मराठीचे शिलेदार समूह.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे