0
4
8
2
9
0
अक्षरयात्रा
निघाली अक्षरयात्रा
लिहा ‘म’ मराठीचा
बोलवले साऱ्या मित्रा
गिरवू या ‘ग’ गडूचा ॥१॥
‘घ’ घासाचा
आईच्या प्रेमाचा
चिऊकाऊचा
गोड आवडीचा ॥२॥
‘ग’ गंमतीचा
मजा मस्तीचा
ग गोडवा
बेसन लाडूचा ॥३॥
आला वास
वड्याचा खमंग
गणूने आणला खास
झाला खाण्यात दंग ॥४॥
‘म’ मराठीचा
मजेत झाला स्वार
मारे फेरफटका
रफार उकार ॥५॥
अ आ ई ची
निघाली गाडी
त त ताईची
काढू खोडी ॥६॥
निघाली अक्षरयात्रा
घेऊन बाराखडी
बरोबर आली चित्रा
चढली अक्षर माडी ॥७॥
नीला पाटणकर,शिकागो
0
4
8
2
9
0



