पं. स. सदस्य निवडणूकीत आवास गणातून प्रिया प्रमोद भगत यांचा दणदणीत विजय
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
पं. स. सदस्य निवडणूकीत आवास गणातून प्रिया प्रमोद भगत यांचा दणदणीत विजय
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग: दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी रायगड जिल्ह्यातील पंचायत समिती सदस्य व जिल्हापरिषद सदस्य पदांसाठी निवडणूक होऊन त्याचा निकाल दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर झाला.
यामध्ये अलिबाग तालुक्यातील ६३ आवास गणातून पंचायत समिती निवडणुकीमध्ये आवास गावातील प्रिया प्रमोद भगत यांनी ५४७६ मते मिळवून प्रतिस्पर्धी उमेदवाराचा १३७७ मतांच्या मताधिक्याने पराभव करीत दणदणीत विजय संपादन केला.
प्रिया प्रमोद भगत यांनी विजयानंतर प्रतिक्रिया देतांना हा विजय ग्रुप – ग्रामपंचायत, आवास माजी सरपंच स्वर्गीय प्रभाकरजी सदाशिव राणे (पप्पा), माजी सरपंच स्वर्गीय मनोहर विनायक भगत (आप्पा), सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय श्रीनिवासशेठ बाळाराम भगत यांना समर्पित करीत असल्याचे सांगीतले.
तसेच या विजयाचे श्रेय
आमचे नेते अलिबाग – मुरुड – रोहा विधानसभेचे दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी, माजी पंचायत समिती सदस्य रणजीत शेठ राणे, ग्रुप – ग्रामपंचायत, आवास माजी सरपंच व विद्यमान सदस्य अभिजीतशेठ राणे, विद्यमान सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य दिलीप विठ्ठल भोईर ( छोटम शेठ ), माझे पती बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे माजी मुख्याध्यापक / माजी प्राचार्य तथा रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस प्रमोद मनोहर भगत यांचे असल्याचे सांगून त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच त्यांनी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते व सर्व मतदार बंधू व भगीनींचे मनःपूर्वक आभार मानले.



