
0
5
1
7
8
7
नारीशक्तीचा विजय
संघर्षाच्या वाटेवर चालतांना
नारीने लिहिला इतिहास नवा
अडथळ्याच्या पर्वतावरती
टाकला विजयाने प्रकाश नवा
बंधनाची साखळदंड तोडून
उभी राहिली ती मनोधैर्याने
स्वप्नांना दिली उभारी नवी
जिंकली दुनिया परिश्रमाने
ज्ञान कर्तुत्व जिद्दीच्या बडाने
तिने उंच यशोशिखर गाठले
नारीशक्तीच्या तेजापुढे त्या
पुढे अंधाराचे जाळे फिटले
आजला तिची विजयगाथा
दाही दिशा दिशात दुमदुमते
नारीशक्ती उज्वल तेजापुढे
नवे युग जणू उजळून निघते
सर्व क्षेत्र काबीज केली तिने
कर्तुत्वाने ठसा ही उमटवला
जागतिक महिला दिनाचा
नारीशक्तीचा विजय दणाणला
बी एस गायकवाड
पालम,परभणी
0
5
1
7
8
7



