मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*🔘संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा🔘*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*📘स्पर्धेचा विषय : नवी पहाट📘*
*🔸मंगळवार : ३१ / डिसेंबर /२०२४*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*नवी पहाट*
घडल्या अनेक चुका
कालच्या गतकाळात
निश्चय मनी केला
दुरुस्ती करू चुकात
ध्येय उराशी बाळगून
यश प्राप्तीच्या मार्गात
एकमेका सहकार्य करू
देशाच्या विकासात
माणुसकी पाळू
मानवी जीवनात
पुन्हा जीवन नाही
सजीव सृष्टीत
पशु पक्ष्यांचा चालू
आहे किलबिलाट
नवचैतन्य घेऊन
आली नवी पहाट
*श्री पोपट सुखदेव मस्के*
*भाळवणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
♾️♾️♾️♾️🌷💥🌷♾️♾️♾️♾️
*नवी पहाट*
गतसालाला निरोप देऊ
हॅपी न्यू इयरचे गाणे गाऊ
दोन हजार चोविस सन संपले
दोन हजार पंचविस लागले !!
नवी पहाट नवी दिशा
नविन स्वप्ने नवी आशा
उगवली नूतन शूभ सकाळ
सुखसमृद्धीचा येईल काळ !!
नव्या युगाला नव्या जगाला
आकांक्षा कामना साकार होई
पल्लवित शुभेच्छांचा वर्षाव होई
नव ऊमेदीला आकार देई !!
नवी पहाट रम्य सुंदर
मोहक अनुभव मनोहर
गोड आरोग्य देई बाहेर
मित्र सारे नवसंकल्प घेणार !!
नववर्षाचे स्वागत करू
नाचू गाऊ आनंदे भरू
आत्मसातू छान विचार
माणूसपण निर्माया कास धर !!
*प. सु . किन्हेकर, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌷💥🌷♾️♾️♾️♾️
*नवी पहाट*
आली नवी पहाट
करू नवे विचार
पाहूं स्वप्नांची वाट
मुखी ठेवू सुविचार ॥१॥
नववर्षाची तरूला
पालवी फुटली
फुलपाखंर उडाली
फुले बहरली ॥२॥
बाग फुलली
मुले जमली
गाऊ लागली
सारी हासली ॥३॥
नव्या पहाटेले
शाळा भरली
गणित भेटले
आकडेमोड केली ॥४॥
इतिहासाची कथा
भूगोलाचा गोल
पृथ्वीची व्यथा
कळे ज्ञानाचे मोल ॥५॥
नवी माझी शाळा
आमचा मेळा
मुलांचा घोळका
लागला सर्वा लळा ॥६॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌷💥🌷♾️♾️♾️♾️
*नवी पहाट*
नववर्षाची आता
उजाडेल नवी पहाट
नव संकल्प करू मनी
पार करण्या जीवनवाट
स्वप्न सोनेरी पाहूनी
उतरवू या सत्यात
जीवन होईल आनंदी
देऊ एकमेका साथ
वृक्षवल्ली,फुलपाखरे
गुणगुणती हर्षाचे गीत
वाराही आनंदाने हा
करी मित्रत्वाची प्रीत
नववर्ष करू साजरे
होई आनंदाची बरसात
आम्ही बालमित्र मिळूनी
करू उज्वल नाव जगात
रमणिय नववर्षाची
नवपहाट आनंदाची
करू संकल्प यथार्थ
चालू वाट जीवनाची
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌷💥🌷♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*नवी पहाट*
सरले वर्षे हे बघता बघता
नवी पहाट होईल आता
स्वागत करू या नववर्षाचे
चला मुलांनो गाता- गाता ||धृ||
नको कुणाशी कट्टी -बट्टी
करू या सर्वांशी फक्त गट्टी
फुलवू या मैत्रीचा नाता..
स्वागत करू या नववर्षाचे
चला मुलांनो गाता गाता..
सोडून देऊ रूसवा फुगवा
नकोच कुणाचा हेवा दावा
नको कुणाशी रागाच्या बाता
स्वागत करू या नववर्षाचे
चला मुलांनो गाता गाता…
मोठ्यांचा ठेवू या मान
जपूया प्रेमाने ते लहान
भुकल्यास देऊ घास खाता खाता
स्वागत करू या नववर्षाचे
चला मुलांनो गाता गाता…
स्वच्छ ठेऊ या भारतभूमी
निसर्ग रक्षणाची घेऊ या हमी
निरोप देऊ या जुन्या वर्षाला
हसत मुखाने जाता जाता
स्वागत करू या नववर्षाचे
चला मुलांनो गाता गाता…
*सौ वनिता गभणे, आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌷💥🌷♾️♾️♾️♾️
*नवी पहाट*
नववर्षाची नवी पहाट
उजळेल ही दाही दिशा
नव्या वर्षाचे संकल्प
धरुयात नवीन आशा
स्वप्नांना पंख फुटतील
करूया स्वप्न साकार
आपापल्या पद्धतीने
देऊ जीवनाला आकार
संपले हे वर्ष आता
जुन्या चुकांना विस्मरू
नव्या वर्षाची सुरुवात
सद्गुणी होऊ कास धरू
नको कुणाशी हेवेदावे
जपू प्रेम मैत्री बंधुभाव
नाही इर्षा, द्वेष मत्सर
नसेल ही जीवघेणी हाव
मिळून मिसळून राहू
एकमेका साहाय्य करू
धावून जावू मदतीला
गरजवंताचा आधार ठरू
अभ्यासा लागू जोमाने
आपण सारे हुशार होऊ
नवी पहाट उजाडेल ही
नव्या दिशेने चालत जाऊ
*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌷💥🌷♾️♾️♾️♾️
*नवी पहाट*
गरगर गरगर काटे फिरले
दिवसांमागून दिवस गेले
बघता बघता वर्षही सरले
बघूया हाती काय उरले ॥
सुखदुःखाचा हिशेब करूया
जे झाले ते गोड मानुया
अंधःकारा ला दूर सारुया
उजेडाची कास धरुया ॥
नववर्षाचे करूया स्वागत
चैतन्याचा गुलाल उधळत
आनंदसरींनी यावे ठुमकत
पुर्ण कराया स्वप्ने नकळत ॥
नवी पहाट घेऊन उगवला
नवतेजाने आसमंत झळकला
ध्येयवाट डोळ्यात साठवून
क्षितिज सारे कवेत घेऊन ॥
आयुष्याची वाट चालूया
नवउमेद संगतीला घेऊया
सोडून मागे पाऊलखुणा
ठसे आपुले पुन्हा उमटवूया ॥
चला मुलांनो मिळून सारे
नववर्षाचे स्वागत करू
वात्सल्याने आपुलकीची
मिळून सारे गुढी उभारु ॥
*सौ. सरला टाले, राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌷💥🌷♾️♾️♾️♾️
*नवी पहाट*
गत वर्षाचा निरोप घेऊ
मागे सारू तो आता काळ
नवी पहाट नव्या आशा घेऊन
येईल नववर्षाची सोनसकाळ
नववर्ष २०२५ येताक्षणी
दाटला हर्ष बाल मनी
हास्य फुलवून स्वागत
केले नववर्षाचे आनंदानी
भेटकार्ड स्वतः मुले तयार
करून रंगबेरंगी छान छान
आशिर्वाद घेतला बाईचा
भेटकार्ड व शुभेच्छा देऊन
सुवीचाराने संकल्प केला
सहाय्यता करु बहिणींची
मोठ्यांचा आदर प्रेमभाव
संगत करू छान मित्रांची
मिळून मिळून शाळेत जावू
आनंदाने अभ्यास करू या
नित्य धडे घेऊन शिक्षणाचे
स्वप्न आपले साकार करू या
*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌷💥🌷♾️♾️♾️♾️
*नवी पहाट*
नवचैतन्य घेऊन नवी पहाट येईल
सर्वांची गोड स्वप्न फुलवून जाईल…१
उत्साहाची उगवेल नवी पहाट
दारी सजेल रांगोळीचा थाट….२
प्रत्येकजण एकमेका शुभेच्छा देईल
सर्वांच्या आनंदाला मग उधाण येईल…३
नव्यावर्षी नव्यापहाटे मी गाठेन उच्चांक नवा
माझ्या स्वप्नपूर्तीची नवी पहाट उगवू दे देवा…४
नव्या पहाटे मला आईच्या कुशीत लोळू दे
तिच्या कुशीचे सुख मला मिळू दे….५
नव्या वर्षात तरी माझे महत्व आईला कळू दे
मोबाईल तेवढा तिच्यापासून लांब पळू दे…६
या नव्या वर्षात सर्वांना प्रेमाची नाती कळू दे
आजीआजोबांचे प्रेम आम्हाला लवकर मिळू दे…७
*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌷💥🌷♾️♾️♾️♾️
*नवी पहाट*
लाडक्या बाळांनो उद्या
उगवेल नवी नवी पहाट
नव वर्षाचा करूया सारे
संकल्पाचा नवा थाटमाट…
संकल्प असा करू जो
पाळता येईल वर्षभर
नको अर्ध्यात मोडणारे
कोणतेही उगी भाराभर…
नित्य वंदू आईवडिलांना
वडिलधारे नि गुरुजीला
दिवसभर कामात आई
करू थोडी मदत तिला…
करू वाचन सुविचारांचे
घडवतील आयुष्याला
देतील चांगला आकार
आपल्या भविष्याला…
नवी पहाट घेऊन येवो
सर्वांच्या जीवनी आनंद
नव वर्षाचा नवा दिवस
हर्षउल्हासात होऊ दंग…
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌷💥🌷♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖