कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मनमानी कारभाराचा प्रसूतीला येणाऱ्या महिलांना फटका
कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मनमानी कारभाराचा प्रसूतीला येणाऱ्या महिलांना फटका
कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मनमानी कारभाराचा प्रसूतीला येणाऱ्या महिलांना फटका
प्रसूतीला येणारी महिला चहा नाश्ता जेवणापासून वंचित
नागपूर: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनातर्फे प्रसूतीला येणारा महिलांना चहा नाश्ता जेवण मोफत देण्याचा नियम असताना कोंढाळी नजीकच्या पाजरा काटे येथील एका प्रसूतीला आलेल्या महिलेला गेल्या दोन दिवसापासून चहा नाश्ता जेवण न मिळाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
रेवती उमेश धर्मे रा. पाजरा काटे तालुका काटोल असे तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. रेवती धर्मे ही महिला कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक 14 मे रोजी प्रसूतीला आली त्यांच दिवशी रात्री 9 ते 10 वाजता दरम्यान या महिलेला प्रसूती झाली. कोंढाळी आरोग्य केंद्रात प्रसूतीला येणाऱ्या महिलांसाठी सकाळी 7वाजता चहा 150 मि. ली, सकाळी 8.30 वाजता नाश्ता पोहे, उपमा,सोजी, ब्रेड त्यापैकी काही ही एक प्लेट दुपारी 12वाजता वरण, भात, भाजी पोळी पूर्ण जेवण दुपारी 4 वाजता चहा,ब्रेड, सोजी रात्री 8 वाजता वरण, भत, पोळी, ऊसळ, भाजी पूर्ण जेवण असा मोफत अहार मिळेल असा मोठा फलक लागला आहे. पण कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात रेवती उमेश धर्मे या दोन दिवस भरती आहे. पण कोणताही चहा, नाश्ता, जेवण मिळाले नाही अशी लेखी तक्रार रेवती धर्मे यांनी वैद्यकीय अधिकारी कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्र यांना केली आहे.
कोंढाळी प्राथमिक आरोग्य केद्रात प्रसूतीला येणाऱ्या महिला व रुग्णांना गैरसोयीच्या अनेक घटना आहे पण बहुतांश महिला तक्रार करीत नाही यांचा फायदा कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व मोफत आहार पुरवठा करणारे संबंधित ठेकेदार घेत आहे. रेवती धर्मे यांनी आपल्या तक्रारी सांगितले की माझे गांव कोंढाळी पासून जवळ म्हणजे जवळपास 4 कि. मी आहे म्हणून मला घरून चहा, नाश्ता, जेवन मिळाले पण अनेक महिला प्रसुती करीता10ते 15कि. मी लांब अंतरावरील दुर्गम आदिवासी गावातून येतात त्यांना कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील मनमानी करभाराने उपाशी राहण्याची वेळ आली आहे. माझ्यावर झालेला अन्याय अन्य महिलांवर होवू नये म्हणून योग्य कारवाई करावी अशी मागणी रेवती उमेश धर्मे यांनी केली आहे.