व्हिजन स्कूलमध्ये ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
व्हिजन स्कूलमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण
वृक्षारोपणासह विविध कार्यक्रम साजरे
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे-दि.15ऑ (प्रतिनिधी) वडगाव शेरी येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेमध्ये देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. शाळेच्या निवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी सौ.पार्वती आबनावे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
झेंडावंदनास मएसोचे उपाध्यक्ष, व्हिजन स्कूलचे संस्थापक सदस्य, श्री प्रदीप नाईक, शाला व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सीमाताई कांबळे आणि पालक- शिक्षक संघाचे सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात विद्यार्थ्यानी देशभक्तीपर कवितांचे वाचन आणि शारीरिक कवायतींचे सादरीकरण केले. इ. दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
माजी विद्यार्थी श्री. प्रीतम व सौ. विशाखा काळे यांनी दहावीला मराठी विषयात चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याना बक्षीसे प्रदान करून
संस्कृत पुस्तके भेट स्वरूपात दिली. स्वातंत्र्य दिना निमित्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
माध्यमिकच्या मुख्याध्यापिका सौ. ममता जैन आणि प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ. रेश्मा कारळे यांनी कार्यक्रमाचे शिस्तबध्द संयोजन केले. विद्या शिंदे आणि मनीषा येलसंगीकर यांनी सूत्रसंचालन केले. वर्षा थोपटे यांनी आभार मानले.





