निरवाना बहुउद्देशीय संस्थेतर्फे १८ मे रोजी बौद्धिक परीक्षेचे आयोजन
अधिकाधिक विद्यार्थ्यांना परीक्षेत सहभागी होण्याचे आवाहन
निरवाना बहुउद्देशीय संस्थेतर्फे १८ मे रोजी बौद्धिक परीक्षेचे आयोजन
बहुजन समाजातील समाज सुधारक यांच्या जीवन चरित्रावर आधारित प्रश्न असतील
अधिकाधिक विद्यार्थ्यांना परीक्षेत सहभागी होण्याचे आवाहन
जिल्हा प्रतिनिधी नागपूर
नागपूर: निरवाना बहुउद्देशीय संस्थेतर्फे १८ मे रोजी बौद्धिक परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.भारतीय घटनेचे शिल्पकार, युगंधर, विश्वरत्न, परमपूज्य, समस्त बहुजनांचे पुढारी, राष्ट्र कोहिनूर भारतरत्न डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंती व बुद्ध पौर्णिमा निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर तसेच समस्त बहुजन समाजातील समाज सुधारक यांच्या जीवन चरित्रावर आधारित बौद्धिक परीक्षेचे आयोजन केलेले आहे.
परिक्षा ही १०० गुणांची असेल. प्रत्येक प्रश्नाला १ गुण देण्यात येईल पेपरचा कालावधी १.३० तासाचा असेल. परीक्षा शुल्क : २० रू फक्त. बौद्धिक परीक्षा दिनांक १८ मे २०२५ रोजी वार रविवारला हनी कॉन्व्हेंट, मिसाळ ले आऊट, नागपूर येथे सकाळी ठिक ०९:३०ते ११:०० या कालावधीत घेण्यात येणार आहे . परीक्षार्थींनी परीक्षेला ०९:०० वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
या परीक्षेचा निकाल व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम दिनांक २१ मे २०२५ ला सायंकाळी ०६.०० ते ९.००या कालावधीत जाहीर करण्यात येईल. स्थळ : त्रिरत्न नगर सांस्कृतिक भवन आशिष बारच्या मागे नागपूर
बक्षीस : प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे रोख बक्षीस देण्यात येईल. तसेच १० उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येईल. असे संस्थेचे अध्यक्ष/सचिव व परीक्षा प्रमुख नितेश मेश्राम, अमर बोदेले व प्राजक्ता खांडेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले आहे.





