Breaking
ई-पेपरचारोळीनागपूरविदर्भसाहित्यगंध

गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 0 9 0 3

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*🌤️विषय : आमच्याही व्यथा🌤️*
*🔹गुरूवार : १५ / ०५ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*आमच्याही व्यथा*

आई नेहमी समजून घेतसे
खरं सर्व आमच्याही व्यथा,
आई मनात जिद्द भरतांना
सांगत असे गुणांच्या कथा.

*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🪷🔖➿➿➿➿
*आमच्याही व्यथा*

तुमच्या कथा
आमच्याही कथा
कथेत मुखोद्योगित होतात
आमच्या नि तुमच्या व्यथा ..

*सौ.भारती धनवे*
*मंगळवेढा जि.सोलापूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🪷🔖➿➿➿➿
*आमच्याही व्यथा*

आमच्याही व्यथा
संघर्षमही आहेत
पुस्तकातील कथा
मनोरंजक आहेत.

*मिनल वामन मुंगुले*
*छत्रपती संभाजीनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🪷🔖➿➿➿➿
*आमच्याही व्यथा*

आमच्याही व्यथा मांडू आम्ही साऱ्याजणी
स्त्री शिक्षण दिले फुले दांपत्यानी
स्त्री पुरुष समानता सांगितले बाबासाहेबांनी
मिळून सारे घालु आकाशाला गवसणी

*अनिल मेश्राम सौंदड जिल्हा-गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🪷🔖➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*आमच्याही व्यथा*

कुणीतरी ऐका
आमच्याही व्यथा
पिण्याच्या पाण्याची
करा ना व्यवस्था.

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🪷🔖➿➿➿➿
*आमच्याही व्यथा*

*पाण्यासाठी वणवण फिरतो*
*सदाच खाली आयुष्याचा ही माठ*
*मतांसाठी गुणगान करती आमचे*
*आमच्याही व्यथा,नेते करी थाट*

*अशोक बी कांबळे, नागपूर*
*© सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🪷🔖➿➿➿➿
*आमच्याही व्यथा*

आमच्याही व्यथा समजून घ्या जरा
रणरणत्या उन्हातलं हे वाळवंटी जीणं
कधी येणार गारवा आमच्या जीवनी
तहान भागविण्यासाठीही रोजच मरणं..!

*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
➿➿➿➿🔖🪷🔖➿➿➿➿
*आमच्याही व्यथा*

वीज-गॅस कधी हंडाभर पाणी
नव्या संकटांचा रोजच खेळ
आमच्याही व्यथा घ्या समजून
जीवनी कसा घालावा मेळ

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🪷🔖➿➿➿➿
*आमच्याही व्यथा*

संवादाचे माध्यम पायपीट
अविरत करतो पाण्यासाठी
आमच्याही व्यथांचे साक्षी असती
शुष्क मन आणि रिकामी मडकी

*सौ. रजनी भागवत.*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🪷🔖➿➿➿➿
*आमच्याही व्यथा*

*तंत्रज्ञानाच्या या दुनियेत*
*दावती फक्त भाकडकथा*
*वार्तांकन करताना दाखवा*
*कधीतरी आमच्याही व्यथा*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔖🪷🔖➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे