0
4
8
2
9
4
निर्भय सबला नारी
निर्भय सबला नारी आजची
भाग्यवंत आहे आज ती
जिच्यामुळे मिळे मान सन्मान
स्त्रीच्या गळ्यात तिचाच साज
रूप तिचे असेल सुंदर
सावित्री सारखी ज्ञानदेवता
जिजाऊ सारखी आई
अशा नारीशक्तीची योग्यता
घरात लक्ष्मी सरस्वतीचा वास
मुलगी,आई,पत्नी, सून ,वावरते
कुटुंबाला निर्भयपणे देते हात
आदिशक्ती महिषासुरमर्दिनी होते
अनेक पैलू असता अंगी
समाज सुधारण्याचे काम करती
नारी शक्ती फार मोठी देणगी
रणरागिणी देशाची मान उंचावती
विश्वाची निर्मिती घडवते पिढी
नारी घे उंच भरारी तू आकाशी
पंखा मध्ये भरुनी बळ
निर्भय सबला नारी मनाशी
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
0
4
8
2
9
4



