Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरमराठवाडा

श्री स.भु.प्रशालेत साने गुरुजी जयंती, ग्राहकदिन साजरा

पद्माकर वाघरूळकर (ईश्वर कसबे) प्रतिनिधी

0 4 8 2 8 4

श्री स.भु.प्रशालेत साने गुरुजी जयंती, ग्राहकदिन साजरा

पद्माकर वाघरूळकर (ईश्वर कसबे) प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

बालानगर दि.२४ (प्रतिनिधी)- पैठण तालुक्यातील श्री सरस्वती भुवन प्रशाला बालानगर येथे पांडुरंग सदाशिव साने (‘साने गुरूजी’) जयंती आणि भारतीय ‘ग्राहक दिन’, साने गुरुजींच्या गीत व कवितांचे गायन, ‘श्यामची आई’ या अजरामर ग्रंथातील संस्कारकथांचे सादरीकरण, भित्तीपत्रकांचे विमोचन अशा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शिक्षक फेरोज पटेल, प्रमुख वक्ते संस्कारयाग विभागप्रमुख पद्माकर वाघरूळकर, आयोजक दहावी अ वर्गशिक्षिका वैशाली कुंभकर्ण या मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन केले. मान्यवरांच्या स्वागतसत्कार व धनश्री गोर्डे, किशोरी गोर्डे, अक्षरा मलेडिया यांनी गायलेल्या स्वागतगीतानंतर आयोजक वर्गशिक्षिका वैशाली कुंभकर्ण यांनी प्रास्ताविक केले.

प्रियांका घोंगडे, प्रियांका वाघ, रोहण भंडारे, सुजीत चाबुकस्वार, सुरज लिपाणे यांच्या हस्तलिखित भित्तिपत्रकांचे विमोचन करण्यात आले. साक्षी ताकवाले, अजिंक्य शेळके, शैलेश गोर्डे, नमन जावळे यांनी ‘खरा तो एकची धर्म’ या प्रार्थनेचे गायन केले. ऋतुजा दिलवाले, सरिता भालेकर यांनी ‘श्यामची आई’ ग्रंथातील संस्कारकथा सांगितल्या. प्रांजल राऊत हिने ‘मी साने गुरुजी बोलतोय’ हे स्वागत सादर केले. भक्ती झेंडे, श्रावण शेळके, सुमीत गोर्डे, वेदिका गोर्डे, श्रुतिका गोर्डे, सोनाली गोर्डे या विद्यार्थ्यांनी साने गुरूजींच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले.

सर्वोत्कृष्ट मनोगताबद्दल वेदिका गोर्डे हिला बक्षीस प्रदान केले गेले. तसेच सर्वोत्कृष्ट मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील वृत्तांत लेखनासाठी बक्षिसे प्रमुख वक्ते पद्माकर वाघरूळकर यांनी जाहीर करून आपल्या भाषणात साने गुरुजींचे चरित्र व चारित्र्य सर्वांसाठीच अनुकरणीय व प्रेरणादायी आहे असे सांगून भारतीय ग्राहक दिनाचे महत्त्व सांगताना ग्राहकांचे अधिकार व कर्तव्ये, ग्राहक संरक्षण कायदा याबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक राजेंद्र गायकवाड यांनी प्रत्येकांनीच साने गुरूजींचे समग्र साहित्य वाचून जीवनात उतरवण्याचे आवाहन केले.

चित्ताकर्षक फलकलेखन कलाशिक्षक प्रदीप ब्राह्मणकार यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया ढाकणे व योगिता गोर्डे यांनी, आभारप्रदर्शन शुभांगी घोंगडे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील सर्वच विद्यार्थ्यांसह शिक्षक शिक्षकेतर सहकाऱ्यांनी सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे