Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

आई रमाई जयंती निमित्ताने उत्तर नागपुरातील नगरसेवकांचा जाहीर सत्कार ८ रोजी

जिल्हा प्रतिनिधी नागपूर

0 4 8 2 8 4

आई रमाई जयंती निमित्ताने उत्तर नागपुरातील नगरसेवकांचा जाहीर सत्कार ८ रोजी

जिल्हा प्रतिनिधी नागपूर

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर : (दि ६) आई रमाई यांचे संपूर्ण जीवन संघर्ष, त्याग व सेवाभावाने ओतप्रोत भरलेले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याला अखंड पाठबळ दिले. संसार, संतती, दारिद्र्य, सामाजिक उपेक्षा व आजारपण अशा असंख्य संकटांना तोंड देत त्यांनी सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याला बळ दिले. त्यांचे जीवन हे प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणास्त्रोत असून, समतेच्या लढ्यातील मौन तपस्विनी म्हणून त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील.

या कार्यक्रमांद्वारे आई रमाई यांच्या विचारांचा प्रसार होऊन समाजात समता, बंधुता, न्याय व मानवतेची मूल्ये अधिक दृढ होतील,याच भावनेतून लोकशाहीच्या या पवित्र प्रक्रियेत प्रभागातील नागरिकांनी दाखविलेला विश्वास, प्रेम व पाठिंबा हा आमच्या लोकप्रतिनिधींच्या सामाजिक बांधिलकीची, प्रामाणिक सेवेची व जनहिताच्या कार्याची पोचपावती आहे. समाजहितासाठी सतत कार्यरत राहण्याची त्यांची तळमळ, विकासाभिमुख दृष्टीकोन व सर्वसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता यामुळेच हा विश्वास सार्थ ठरला आहे. त्या अनुषंगाने नॅार्थ नागपूर महिला फोरम, नॅार्थ नागपूर सिनीयर सिटिझन फोरम व युवा ग्रॅज्युएट फोरमच्या वतीने, महानगरपालिका निवडणुकीत उत्तर नागपूरातील प्रभाग निहाय बहुमताने विजयी झालेले विविध पक्षाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष व लोकाभिमुख नगरसेवक यांचा जाहीर सत्कार समारंभ रविवारी दि. ८ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजता नागोराव पाटणकर बाल उद्यान येथील खुले सभागृह, पाटणकर चौक नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

ज्येष्ठ पत्रकार प्रमोद काळबांडे यांच्या अध्यक्षतेखालील आणि आसीनगर झोन, मंगळवारी झोन, सतरंजीपूरा झोनचे उपायुक्त उपस्थित राहणार आहेत. नवनियुक्त नगरसेवक यांच्या विजयामुळे प्रभागातील सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य व सामाजिक उपक्रमांना नवी दिशा मिळेल, असा आम्हाला दृढ विश्वास आहे. या गौरवपूर्ण क्षणी त्यांचा जाहीर सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देणे व पुढील कार्यासाठी प्रेरणा देणे, हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

तसेच आई रमाई यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी महिला फोरम तर्फे उत्तर नागपुरात पहिल्यांदाच रानमेवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे यात हिवाळ्यातील वाट्यानाच्या शेंगा, सोला, हरभरा, उकडलेले बोर, शिंगाडे अशा विविध प्रकारची मेजवानी उपलब्ध करण्यात येईल. असे आवाहन महिला फोरमच्या उषा उके, नंदिनी गौतम, उषा जंगम, पल्लवी आटे, उषा वासनिक नम्रता मोटघरे, गौतमी पानतावने, तसेच सिनीयर सिटिझन फोरमचे अश्विन बोरकर, नरेश साखरे, नरेश कोटांगले, अनिरुद्ध बोदेले, अशोक बोंदाडे, मोतीलाल नाईक यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे