0
4
8
2
9
3
पूर्वसंध्या..
नभी आजची पूर्वसंध्या
केशरी लाली रंगलेली
आज ती नवी भासे काही
उद्याच्या वाटेवर गुंतलेली..
ती पूर्वसंध्या आठवतेय
पूर्वीचे ते कठोर दिवस
देशासाठी प्राण त्यागले
केलेले कितीक नवस..
देशप्रेमाने सळसळलेली
पूर्वसंध्या ज्यांनी बघितलेली
देशासाठी बलिदानानी
देह रक्तरंजित केलेली..
स्वातंत्र्यांचाचं ध्यास मनी
स्वप्नसाकार करण्याची धमक
पूर्वसंध्येनी होती बघितलेली
वीरांच्या डोळ्यातली चमक..
स्वातंत्र्याची ज्योत पेटवली
गुलामगिरीचे साखळदंड तोडून
नव्या युगाची झाली पहाट
हाती ज्ञानाची मशाल घेऊन
प्रज्ञा सवदत्ती
गोरेगाव, जि.रायगड.
========
0
4
8
2
9
3



