भाकरवड येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी
भाकरवड येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी
अलिबाग:(दि.१०) तालुक्यातील भाकरवड येथे बुधवारी मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले. पोयनाड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर असोसिएशन व सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ भाकरवड आणि लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल आणि यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात डोळ्यांची संपूर्ण तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्म्याचा अचूक नंबर काढून देणे, डोळ्याच्या तिरळेपणाची तपासणी, डोळ्यांच्या आतील पडद्याची तपासणी, काचबिंदूची तपासणी लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या नेत्रतज्ञांकडून करण्यात आली. या शिबिरात एकूण १८० रुग्णांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला.
या शिबिरात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी पोयनाड फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष चेतन चिपळूणकर, उपाध्यक्ष प्रसाद पाटील, सचिव मनोज टेमकर, खजिनदार महेंद्र म्हात्रे यांच्यासह फोटोग्राफर असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते. यासह सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष शंकर पाटील आणि सर्व सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सर्व नियोजन पोयनाड फोटोग्राफर असोसिएशनचे खजिनदार महेंद्र म्हात्रे यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.



