0
4
8
3
0
0
कवी शब्दांचा जादूगर
कवी शब्दांचा जादूगर
शब्दा शब्दातून जोडी अक्षर
शब्द मोत्यांची विनविद्येची
काव्यमालेत गुंफतोअक्षर मोतीं प्रकार
किती वर्णू कशी सांगू
न्यारी किमया शब्दांची
घाली भुरळ मनाला
भारी दुनिया शब्द काव्यांची
साहित्याच्या लेखणीतून किमया
शब्दांची नवरस शृंगारची
शब्द सूर्याच्या संगती
माय मराठीची अलंकार भाषेची
कवी शब्दांचा जादुगार
शब्द नाना भावनांचे
दिव्य दृष्टी चा मालक
कवी शब्दांचा सहज अक्षराचे
किमया शब्दांची न्यारी काव्यातून
शब्दप्रभू नित्य उमटती मराठीचे
साहित्य फुलवू ज्ञान समृद्धीने
लेखन शैलीतून उभे आत्मविश्वासाचे
सुखदुःखाची साथ शब्द होती आधार
साहित्य दरवेळी शब्द फुलांची बरसात
शब्द शरद चांदण्यात चिंब भिजलेल
शब्द पाहतात प्रतिबिंब आरशात
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
===========
0
4
8
3
0
0



