0
4
8
2
9
3
प्रेमाचं ऑडिट
प्रेमाचं ऑडिट, प्रत्येकाचचं वेगळं
हिशोब जुळेना,सगळ्याला सगळं
कधी नफा तर,कधी सोसला तोटा
कास सत्याची, हिशोब नसे खोटा
प्रेम दिले घेतले,असेल कमी जास्त
पटले ना मनाला,नाकारले ते रास्त
आमिषापोटी कुनं, प्रेम दिलं घेतलं
जमा वजा खर्चात,त्यालाही मापलं
प्रेमाचं ऑडिट केलं,झाली बरोबरी
कधी निर्वाज भेटलं, स्विकार्य तरी
प्रेम रक्ताच्या नात्यागोत्याच भेटलं
नात्यापलीकडचंही मनोमन जपलं
मोह माया प्रेम,जिव्हाळाही भेटला
राग मत्सर द्वेषाने,जीव ही विटला
बी एस गायकवाड
पालम,परभणी
============
0
4
8
2
9
3



