आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरनागपूरमराठवाडासाहित्यगंध
भावदर्शन
विष्णू संकपाळ बजाजनगर जि.छ. संभाजीनगर

0
5
4
7
2
3
भावदर्शन
भक्ती असो की प्रिती
कशाला हवे प्रदर्शन
फक्त स्वतःपुरते पुरे
साधे शुद्ध भावदर्शन.. //
असो देवाचे देवालय
किंवा प्रेमिकेचे ह्रदय
या प्राप्तीसाठी आधी
व्हावा त्यागाचा उदय.. //
असावे शांत संयमी
नको क्रोधाचा प्रलय
साधावी लागते हळू
मनाशी मनाची लय.. //
असून चालत नाहीच
निव्वळ मनो कामना
जिंकण्याइतकी सक्षम
हवीय निस्सीम साधना..//
छेडावी त्याची ह्रदयतार
आपण घेताक्षणी श्वास
भेटीलागी जीवास अशी
त्यालाही लागावी आस.. //
विष्णू संकपाळ बजाजनगर
जि.छ. संभाजीनगर
==========
0
5
4
7
2
3



