0
4
8
2
8
4
भेट पहिली आठवा
भेट आमची पहिली
एका सकाळी जाहली
पायी मी फिरत होतो
गच्चीत तिला पाहिली
स्नान करुनी केस ती
पुसत होती गच्चीत
केस झटकता दोन
थेंब माझिया डोक्यात
चमकून मी पाहिले
नजरा नजर झाली
ओठी माझ्या शीळ आली
लाजून ती चमकली
रोज सकाळी तिच्याशी
डोळ्यांची भेट होतसे
शीळ माझी ऐकूनिया
गच्चीत ती येत असे
एके दिवशी गल्लीत
भेट तिच्याशी झाली
धीर धरुनी मनात
हात धरला हातात
भेट माझ्या पालकांना
सांगितलं तिनं मला
जाऊन भेटलो त्यांना
प्रेमाचा स्वीकार झाला
एके दिवशी आमचे
शुभमंगल जाहले
चाळीस वर्षे जाहली
दिवस सुखात गेले
एका शीळेने आमचे
जीवन हे बदलले
आठवण म्हणूनिया
शिट्टी रोज मी वाजवे
प्रवीण हरकारे अहमदनगर
=========
0
4
8
2
8
4



