मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धेतील रचना
मुख्य संपादक: राहुल पाटील
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*????संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा????*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट दहा????????????*
*????स्पर्धेचा विषय : गवताची पात????*
*????मंगळवार : ०५ / नोव्हेंबर /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*गवताची पात (बालकविता )*
गवताची पात बघा
फार फार नाजूक
तालावर डोलते
जेव्हा येते झुळूक…!!
सूर्याच्या किरणात
चम चम चमकते
फुलपाखरासोबत
फेर धरून नाचते…!!
रिमझिम पावसात
पुन्हा पुन्हा भिजते
चिमुकले रूप तिचे
सर्वांसाठी झिजते…!!
किड्या किटकांना
घेते हळूच कुशीत
मखमली स्पर्शाने
सान थोर खुशीत…!!
जणू हसरी परी
देई आनंदाचे दान
हिरवे हिरवे रूप
सुंदर आणि छान…!!
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षीका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⛈️????♾️♾️♾️♾️
*गवताची पात*
कोण टाकतो बीज?
कुठून ते अंकुरते?
सांग ना ग आई कसे ते
अनाथ असूनही फुलते
दवबिंदू त्यावर पडता
मोत्यासारखे चमकते
स्पर्श करता त्याला
फक्त हातच ओले होते
गवताची पात ती बाळा
आम्हा खूप काही शिकवते
निराधार जगतांना कधी
असेच मुसमुसून रडते
आम्ही समजतो ते दवबिंदू
ती ओस थंडीची असते
पाहायला त्याची सुंदरता
दुपारी उठायचे नसते
समजलो तुझा इशारा
लहान असलो तरी कळते
गवताची पात आज मी
तुझ्यासाठी दुर्वा म्हणुन तोड़ते
*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⛈️????♾️♾️♾️♾️
*गवताची पात*
हिरवी, हिरवी गवताची पात
वसुंधरेवर शोभून दिसते
हात फिरवता त्यावरती
स्पर्शाने त्या खुलून येते….
डोंगर रानावर,पाय वाटेवर
कुठेही, कशीही छान फुलते
कधीतरी हाताला पात कापते
वाऱ्याची झुळूकेवर ती डोलते…
बिना खताची,बिना रोपाची
चराचरांमध्ये सुरेख उगवते
पावसाच्या बरसाती मध्ये
छान छान न्हावून निघते….
*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा -पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⛈️????♾️♾️♾️♾️
*गवताची पात*
रानोमाळी उजाड जागी
गवताची पाती उगवती
आनंदे सारीच कशी ती
वाऱ्यावरी स्वच्छंद हलती ॥१॥
शिळ घालत येई वात
करती हर्षभरे स्वागत
गवताची पाती हासत
रमती आपल्याच विश्वात ॥२॥
फुटे अंकूर रानोरानी
बिज टरारून भूमीतूनी
हिरवी,पोपटी वाढुनी
डौलात डोलती काननी ॥३॥
वेडी फुलपाखरे संगती
गवताच्या पातीत खेळती
इवलीशी नाजुक ती
क्षण सारे साजिरे करती ॥४॥
पिवळी हळद लावूनी
हिरवाकंच चुडा भरूनी
शेला सोनेरी लेवुनी
पोपटी शालुत येती सजुनी ॥५॥
डोंगरमाथी मुले सोनुली
पाहण्या येती गवताची पात
रानोमाळी फिरून चिमुकली
जाती घरोघरी मजेत ॥६॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⛈️????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ५.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*गवताची पात*
गवताची पात
लावली अंगणात
फुलांनी बहर
आणलाय त्यात
पांढरीशुभ्र लागली
झुबकेदार फुले
वाऱ्याच्या झोतात
वाऱ्यासंग डुले
गवताची पात
हिरवी हिरवीगार
गुलाबी फुलांचा
आलाय बहार
रेन लिली फुला
तसं आयुष्य कमी
कमी काळ सुंदर
जगण्याची हमी
गवताची पात
खडकाळ रानात
पिवळीधमक फुलं
लगडली अंगात
लुसलुशीत दिसे
मोह गाई वासराला
करकर खाऊन
फस्त करी तिला
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⛈️????♾️♾️♾️♾️
*गवताची पात*
गवताची पात
लसलुसीत दिसायची
सुंदर सुंदर फुले
चिमणी पाखरे बसायची
हिरवा हिरवा गवत
एकलग दिसायचा
त्यात सुंदर फुले
रंगीबेरंगी असायचे
फुल पाखरे घेती
फुलांचा मस्त आस्वाद
गाई ढोरे खाती
कोवळी कोवळी गाद
गवताची पात जनू
दिसायची गालीच्छा वाणी
वरून असायचा गवत
खालून असायचा पाणी
मुले मुली आम्ही
मस्त खेळायचे गवतावर
मस्त हातात काठी धरून
मारत असू पाण्यावर
मग यायचे गाईढोरे
जमत असायचे सारे
कोणी प्यायचे पाणी
कोणी खायचे गवत सारे
गवताची पात असायची
डोंगरमाथी नदीनाले
गरद हिरवे अंकुरावर
दिसायचे सुंदर सुंदर फुले
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????⛈️????♾️♾️♾️♾️
*गवताची पात*
गवताची पात धारदार
वाऱ्यासंगे डोलतात फार
हलवूनी माना बोलवतात
खेळायला या सांगतात
आनंदाने नाचू गाऊ खेळूया
हिरव्या गालीच्यावर लोळूया
गालीच्यावर मुले मारतात उडी
फेर धरूनी मुली खेळतात फुगडी
गवताप्रमाणे नम्र होऊया
मोठ्यांच्या आज्ञा पाळूया
दुःखालाही सामोरे जाऊ
पुन्हा नव्याने जीवन जगू
*श्री पोपट सुखदेव मस्के*
*भाळवणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
♾️♾️♾️♾️????⛈️????♾️♾️♾️♾️
*गवताची पात*
काळ्याशार भुईवर
पडल्या खोलवर तडा
प्रतिक्षा पावसाची
न्हाऊन निघाया ।।
काळ्याशार भुईवर
पडल्या पावसाच्या सरी
सुगंधित अत्तर
गवताच्या कोंबाला वाट करी ।।
गवताचे हिरवे कोंब
आपले कसे ऐटीत उभे
सूर्यप्रकाश सुद्धा त्याला
न्याहाळून बघे ।।
गवताचे हिरवे पात
वार्याशी डुले
भास जणू
शब्द बोले ।।
गवताचे हिरवे पात
वार्याशी पळे
निसर्गाची किमया जणू
निसर्गाशीच खेळे ।।
गवताचे हिरवे पात
हाताला वाटे मऊ
निसर्गाने जणू केला
हिरवा मखमली गालिचा देऊ ।।
गवताचे हिरवे पात
कधी रोगांवर औषधोपचार
तर कधी माझ्या गणेशावर
दुर्वांचा भरमार।।
अशी निसर्गाची किमया
छोट्टंसं इवलंसं हिरवं
गवताचं पातं
आलं धरतीवर किमया दाखवाया। ।
*सौ.माधुरी हेमराज लांजेवार*
*मु.नागपूर ता.नागपूर जि.नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????⛈️????♾️♾️♾️♾️
*गवताची पात*
गवताची पात हिरवीगार
गवतफुल डोलतं रंगदार।
हवेची झुळूक येता थंडगार
लवलवते गवत पाताची धार।।१।।
सुर्य किरण पडता उजळते
गवताची पात पहा लाजते।
पातीवरती फुल कसे डोलते
शेतशिवारात गवतपात बहरते।।२।।
गवतावरती दवबिंदू चमकदार
भासतो अनमोल मोती शानदार।
फुलपाखरू भिरभीरते मजेदार
जसे पातीसवे नृत्य बहारदार।।३।।
डोंगरदरी कडेकपारीत रानमाळी
गवतपात बावरते निसर्गराजा सोबती।
नदी ओढा झरेत पाण्यासंग वनमाळी
न्हाऊन नवतीची निसर्गराणी शोभती।।४।।
*श्री गणेश नरोत्तम पाटील*
*ता.शहादा जि.नंदुरबार*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????⛈️????♾️♾️♾️♾️
*गवताची पात*
ती गवताची पात
कशी लवलवते
तिच्या जीवनाचं गूज
जणू आम्हास सांगते
येवो ऊन्ह पाऊस
कशी तग धरते
कापोत कुणीही
नवपालवीने बहरते
कुणाच्या पोटाचा
चारा, तृप्ती बनते
कुणाच्या आजाराचं
मौलिक औषध बनते
कधी पावन होते
देव्हाऱ्यातील श्रीचरणी
श्रमणाऱ्या बळीराजाची
कधी बनते ती दुलई
गवताची पात ती
दिसे जरी ईवलीशी
जीवनमर्म शिकवी
किती मोठं मनुजाशी
चला तर मुलांनो
तिला जगवूया
तिच्या दुलईवर
रोज रोज खेळूया
*तारका रुखमोडे*
*अर्जुनी जि. गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⛈️????♾️♾️♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.????*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????????संकलन /मुख्य प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖



