
0
5
4
7
7
9
बाप
तो रागावतो,ओरडतो
हातही उचलतो कधी कधी
पण मायसारखं प्रेम दाखवत नाही
आमच्या सुखासाठी, आनंदासाठी
तो स्वतः दु:खी होतो
पण त्या दु:खातही तो आनंदी असतो.
त्याच्या कष्टात
आमचं भविष्य दडलेलं असते
त्याच्या प्रत्येक दुःखात आमचं
सुख लपलेले असते.
आज तो वृद्ध झालेला
वयाने थकलेला पण
मनाने तरुण असलेला
माझा सुपर हिरो
त्याचा थकलेला हात
हातात घ्या आणि
कडकडून मिठी मारा
त्याला सारं काही मिळेल.
भुमेश्वरी सातपुते खोंडे
ता. उमरेड जि.नागपूर
=========÷===
0
5
4
7
7
9



