केंद्रीय मंत्री ‘मा. नितीन गडकरी’नी त्यांच्या ‘फार्म हाऊस’ वरील होळी महोत्सवात पत्रकारांना भेट नाकारली
रजत डेकाटे, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री ‘मा. नितीन गडकरी’नी त्यांच्या ‘फार्म हाऊस’ वरील होळी महोत्सवात पत्रकारांना भेट नाकारली
भाजपच्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना मात्र प्रवेश
गडकरींनी पत्रकारांना सन्मानपूर्व वागणूक द्यायला हवी; पत्रकारांचा सूर
रजत डेकाटे, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर/ धापेवाडा: (दि ३ मार्च) देशात सर्वत्र धुलीवंदनाचा उत्साह सुरू असतांना होळी या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी दरवर्षीप्रमाणे यंदाही धापेवाडा येथे होळीला त्यांच्या मालकीच्या भक्ती फॉर्म हाऊसवर आले होते. या सणाच्या निमित्ताने ते दरवर्षी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते व मान्यवरांची भेट घेत असतात. परंतु यंदा त्यांनी नागपूरहून आज ( ३ मार्च) आलेल्या तसेच स्थानिक पत्रकारांना अपमानजनक वागणूक देत भेट नाकारल्याने पत्रकारांमध्ये असंतोषाची व भेदभावाची भावना निर्माण केल्याचे जाहीर सूर निघाले.
यंदाच्या होळीला स्थानिक पत्रकार प्रवीण अडागळे, संपादक साप्ताहिक महाराष्ट्र सपूत, रजत डेकाटे, जिल्हा प्रतिनिधी ‘बिनधास्त न्यूज’, सकाळ प्रतिनिधी नरेंद्र धार्मिक, आय न्यूज प्रतिनिधी, इशिका राजू धार्मिक या माध्यम प्रतिनिधींची भेट नाकारण्यात आली.
आज मंगळवार रोजी (दि. ३) सकाळी सुमारे साडे अकरा वाजताच्या सुमारास धापेवाडा येथील पत्रकार, मंत्री महोदयांची भेट घेण्यासाठी त्यांच्या मालकीच्या ‘भक्ती फार्म’ हाऊसवर पोहोचले. पत्रकारांनी नियमित होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटीची विनंती केली होती. म्हणण्यानुसार, कार्यक्रमस्थळी समन्वयाची जबाबदारी पाहणारे निखिल बहादुरे यांनी त्यांना भेट देण्यास मनाई केली. विशेष म्हणजे, त्याचवेळी काही पक्षाचे नेते मंडळी उपस्थित होते. त्यांना मंत्री महोदयांची भेट घेण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे माध्यम प्रतिनिधींमध्ये नाराजी पसरली.
सार्वजनिकरित्या लोकप्रतिनिधींच्या कार्यक्रमात माध्यमांना सन्मानजनक वागणूक मिळणे अपेक्षित असते. सार्वजनिक जीवनातील व्यक्तींशी संवाद साधणे हे पत्रकारांचे कर्तव्य असून अशा प्रकारे भेट नाकारल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या संदर्भात संबंधितांकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळू शकले नाही. मात्र या घटनेमुळे पत्रकार वर्तुळात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा मा. नितीनजी गडकरी यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.



