0
1
9
8
2
2
एक तू
एक तूच आहेस सगळे बनवणारा
मग का बनवलेस माणसाला इतके क्रूर
लचके तुटतात अंगाचे अन् होते लाही लाही
जेव्हा होतात मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना
अन् उठतात मना मनात वादळं
त्या वादळांना थोपवणे तुला जमले का
कुठे लागला का कधी तुझा विचारांना लगाम
का सुटलेला हा घोडा असाच बेफाम
आणि कोणीच कसे नाही आवर घालायला
अशीच चालवणार का तू समाजरीत
हरवत चाललेला मानव अन् हव्यासापोटी पडणारे खून
का उमगली नसेल कधीच
एका प्राणाची किंमत….
एका वेदनेचे मूल्य किती
का नाही तू समजावत
अंगावर शहारे येतात पुन्हा पुन्हा
आनंद जेव्हा मरणयातनांचा लुटती
साजरे करतात रे ते क्षण
इथे कणा कणाने भावना तुटती…
आक्रोशाचे शब्द ही खुंटती..
शर्मिला देशमुख-घुमरे
केज रोड,जि.बीड
0
1
9
8
2
2