Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनगोंदियानागपूरब्रेकिंगविदर्भ

न्यू मून इंग्लिश मिडीअम स्कूल येथे ‘बालप्रतिभांचा उज्ज्वल सोहळा’

तारका रूखमोडे, जिल्हा प्रतिनिधी गोंदिया

0 4 8 2 8 2

न्यू मून इंग्लिश मिडीअम स्कूल येथे ‘बालप्रतिभांचा उज्ज्वल सोहळा’

वार्षिक स्नेहसंमेलनाचा जल्लोष उत्साहात

तारका रूखमोडे, जिल्हा प्रतिनिधी गोंदिया

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अर्जुनी/मोर ( दि १३ जानेवारी) : न्यु मून इंग्लिश मिडीअम स्कूल तथा सायन्स ज्युनिअर कॉलेज येथे स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री. लायकरामजी भेंडारकर ( अध्यक्ष जिल्हा परिषद गोंदिया ), अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष यशवंत परशुरामकर (अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी/मोरगाव) हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार अनिरुध्दजी कांबळे(तहसील कार्यालय अर्जुनी/मोर.),नगराध्यक्षा सौ.मंजुषा बारसागडे, आम्रपाली डोंगरवार(सभापती पंचायत समिती अर्जुनी), संदीपजी कापगते (उपसभापती पंचायत समिती अर्जुनी), शाळा सचिव ओमप्रकाशसिंह पवार, संचालक भाऊराव पत्रे, संतोष बुकावन,प्राचार्य राकेश उंदिरवाडे, राधिका भेंडारकर (विशाखा समिती )उपस्थित होते.

प्रथमत: मान्यवरांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,क्रांतिसूर्य म. फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. तारका रुखमोडे यांनी प्रास्ताविकेत स्नेहसंमेलन घेण्यामागचा हेतू स्पष्ट केला,शाळेची पूर्वस्थिती व सद्यपरिस्थिती,शाळेची कृतिशीलता, शाळेची दिवसेंदिवस होत असलेली प्रगती इत्यादींचा आढावा घेतला.नंतर २०२५ मध्ये दहावी व बारावी उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी जुली लाडे, तन्मय नाकाडे ,प्रिंस बांडे ,लक्की शाहारे, अलिशा तडपल्लीवार ,जयेश नाकाडे यांचा सत्कार करण्यात आला.

क्रीडाक्षेत्रात व कलाक्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन जिल्हा, विभागीय, व राज्य स्तरावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन अतिथींच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्यांत सुप्त गुण दडलेले असतात. अंगात असलेल्या सुप्त गुणांची ओळख झाली पाहिजे, त्या दिशेने वाटचाल केल्यासच सर्वांगीण प्रगती होते . गुणांची ओळख पटविण्यासाठी शालेय जीवनात स्नेहसंमेलने ही माध्यमे असतात .यासाठी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनाच्या प्रत्येक उपक्रमात भाग घेऊन यश संपादन केले पाहिजे. असे प्रतिपादन उद्घाटक लायकराम भेंडारकर यांनी केले.

यशवंतराव परशुरामकर यांनी स्नेहसंमेलनातून क्रीडा ,सांस्कृतिक व विविध कला गुण प्रदर्शित करण्याची संधी उपलब्ध होते. यातूनच व्यक्तिमत्व विकसित करण्याची चालना मिळते असे प्रतिपादन केले. तसेच अनिरुद्धजी कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व विशद केले.

शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले . विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पोशाखात बहारदार नृत्य सादर केले.
बक्षीस वितरण कार्यक्रमात अध्यक्षस्थानी संचालक गिरीषजी पालीवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून ‌संचालक राधेश्याम भेंडारकर ,भाऊराव पत्रे,नगरसेवक अतुल बन्सोड, प्रा.हेमंत परशुरामकर,उपस्थित होते.बौद्धिक उपक्रम व विविध प्रदर्शनीमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.तारका रुखमोडे व त्रिवेणी थेर यांनी केले.आभार प्रा.राकेश उंदीरवाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या सफलतेसाठी प्रा.सुरज मोटघरे, प्रा.प्रवीण नागपुरे,सागर जांभुळकर , शुभम शाहारे ,प्रतीक्षा राऊत,निकिता बन्सोड, प्रा.निकिता मानापुरे, प्रीती पाटणकर,शीला बोरीकर,पायल बोरकर,छबू बागडे,प्रतीक्षा डोंगरवार, चंदाताई शिवणकर,रिना राऊत,राकेश रामटेके, चंद्रशेखर नाकाडे,ज्ञानेश्वर परिहार,विणा लांजेवार,दिपाली मसराम यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे