कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
सेवादान बी एस गायकवाड पालम,परभणी

0
4
0
8
9
0
सेवादान
स्वतःसाठी सारे जगतात
इतरांसाठी थोडं जगावं
होईल आपल्यापरी जेवढं
करता येईल तेवढं करावं
दुःख पाहून इतरांचे कधी
सेवाभाव वृत्ती रुजवावी
होते आपल्याकडून मदत
सेवादान भावनेने करावी
परतफेडीची नको अपेक्षा
कृतज्ञ वृत्तीने वागेल म्हणून
सत्कर्म करून हो मोकळा
तिथले तिथंच द्यावे सोडून
रक्तदान वा सुश्रुषा करून
कधी द्रव्यदान,अन्नदानाने
संतुष्ट करावा आत्मा त्याचा
देऊन उदार अंतःकरणाने
खुलती रंजली गांजली मने
देतीलचं आशिष हृदयातूनी
दया,प्रेमभाव जागृत होईल
मानवकल्याण होई यातूनी
बी एस गायकवाड
पालम,परभणी
=========
0
4
0
8
9
0





