शाळेला गावाचा आधार असल्यास विद्यार्थ्यांची प्रगती नक्कीच; सरंपच सीमा पडोळे
जि प प्रा शा भोजापूर येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात
शाळेला गावाचा आधार असल्यास विद्यार्थ्यांची प्रगती नक्कीच; सरंपच सीमा पडोळे
जि प प्रा शा भोजापूर येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा: ‘शाळेला गावाचा आधार असल्यास विद्यार्थ्यांची प्रगती नक्की होते आणि पालकांनी आपल्या मुलांचा नियमित अभ्यास घेतल्यास मुलांना शिस्तही लागते व संस्कारमय विद्यार्थी घडण्यास मदत होते’. तसेच आपले विद्यार्थी हे आपल्या गावातील शाळेतच शिकलेत तर गावाचा विकास नक्कीच होते असे गौरवोद्गार भोजापूरच्या सरपंच सीमा पडोळे यांनी काढले. त्या पवनी तालुक्यातील जि प उच्च प्रा शा भोजापूर येथे आज दिनांक १५/०८/२०२४ आयोजित ७८ व्या स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण समारभांत प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
या ध्वजारोहण समारंभास शा व्य समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कोरेकर, अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सीमा पडोळे, उपसरपंच श्रीधर रंगारी, मुख्याध्यापक प्रवीण पडवाल, ढाले सर व शा व्य समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्ष लक्ष्मीकांत कोरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
आयोजित कार्यक्रमात शालेय मंत्रिमडळाचा व सहायक शिक्षिका त्रिवेणी पराते यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वर्ग २ ते ७ वीच्या मुला मुलींची समायोचित भाषणे, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन पदवीधर शिक्षिका मधुबाला देशमुख यांनी केले तर आभार पाटील सर यांनी मानले. या कार्यक्रमास गावातील शिक्षणप्रेमी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.