जे. एस. एम. महाविद्यालयात ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
तुषार थळे, प्रतिनिधी
जे. एस. एम. महाविद्यालयात ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
उत्कृष्ट एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. प्रविण गायकवाड व युवा महोत्सवातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
तुषार थळे, प्रतिनिधी
अलिबाग: आज भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जनता शिक्षण मंडळाचे जे. एस. एम. महाविद्यालय व अॅड दत्ता पाटील काॅलेज आॅफ लाॅ च्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाविद्यालय अशी तिरंगा रॅली काढली. यामध्ये जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड गौतम पाटील, दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यानंतर जनता शिक्षण मंडळाच्या कार्यालयासमोर मा. अॅड. गौतम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. या निमित्ताने महाविद्यालयातील विविध क्षेत्रातील गुणवंताचा सत्कार करण्यात आला.
मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2022-23 करीताचे एन. एस. एस. च्या माध्यमातून मागील तीन वर्षात उत्कृष्ट सामाजिक उपक्रम व कार्यक्रम राबविल्याबद्दल जिल्हास्तरीय उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व उत्कृष्ट एन. एस. एस. युनिट पुरस्कार जाहीर केले. यामध्ये जे. एस. एम. महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्रविण गायकवाड यांना उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व जे. एस. एम. महाविद्यालयाला उत्कृष्ट एन. एस. एस. युनिट पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या धवल कामगिरीबद्दल जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील, उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील, सचिव गौरव पाटील यांनी अभिनंदन केले.
आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांच्या हस्ते डॉ. प्रविण गायकवाड, डॉ. मीनल पाटील डॉ. सुनील आनंद यांचा सत्कार करण्यात आला.
शैक्षणिक वर्ष 2020-21 ते 2022-23 दरम्यान प्राचार्या डॉ. सोनाली पाटील व तत्कालीन प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या एन एस एस युनिट तर्फे विविध सामाजिक उपक्रम राबाविले गेले. यामध्ये हर घर तिरंगा अभियान, कोरोना काळात जनजागृती व फेस मास्क वाटप, लसीकरण मोहीम, आरोग्यविषयक जनजागृती, एड्स जनजागृती, महिला सबलिकारण कार्यक्रम, किमान कौशल्य विकास उपक्रम, कापडी पिशव्या बनविणे प्रशिक्षण, नारळ काढणी प्रशिक्षण, सोलर स्टडी लॅम्प बनविण्याचे प्रशिक्षण, रक्तदान शिबीर, जनजागृती रॅली, जनजागृतीपर पथनाट्य, मतदार जनजागृती कार्यक्रम, मतदार नोंदणी मोहीम, पर्यावरण जनजागृती कार्यक्रम, वृक्षारोपण, परहूर येथील समर्थकृपा वृद्धाश्रमास दिवाळी फराळ वाटप, स्वच्छ भारत अभियान, प्लास्टिक मुक्त अभियान, स्वस्थ भारत अभियान, मेरी माटी मेरा देश अभियान, फिट इंडिया अभियान, तंबाखू मुक्ती अभियान तसेच मनिभुते या गावात विविध सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या राबविले. या सर्व कार्याची दखल घेऊन मुंबई विद्यापीठाने डॉ. प्रविण गायकवाड यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी व महाविद्यालयाच्या एन. एस. एस. युनिट ला उत्कृष्ट एन एस. एस. युनिट म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
तसेच मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सावात रायगड जिल्हा दक्षिण विभागात जे एस एम महाविद्यालयाच्या विद्यारथ्यांनी २८ पैकी तब्बल १९ स्पर्धांमध्ये यश संपादन करून सर्वात जास्त पारितोषिके मिळविण्याचा बहूमान पटकावला, तर अॅड. दत्ता पाटील ला्ॅ काॅलेज च्या विद्यार्थ्यांनी देखिल एकूण ६ स्पर्धांमध्ये यश मिळविले. या बद्दल सर्व विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणार्या सर्व प्राध्यापाकांचा सन्मान करण्यात आला.





