Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनबीडब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्र

जि.प.केंद्र व कन्या शाळा मादळमोही येथे “राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जन्मोत्सव उत्साहात

मिसाळ मॅडम यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

0 5 1 6 4 1

जि.प.केंद्र व कन्या शाळा मादळमोही येथे “राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जन्मोत्सव उत्साहात

मिसाळ मॅडम यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी, बीड

बिनधास्त न्यूज नेटवर्क

बीड/ मादळमोही (दि १२ जाने) : “राष्ट्रमाता जिजाऊ व थोर युगपुरुष स्वामी विवेकानंद जन्मोत्सव” निमित्त आज (दि. १२) रोजी सकाळी परिपाठानंतर केंद्रीय मुख्याध्यापक आदरणीय श्री. मुळे सर व केंद्रप्रमुख आदरणीय श्री. मकरध्वज जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मॅडमनी अथक परिश्रम घेऊन विविध स्पर्धाचे आयोजन आणि सुंदर नियोजन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा केंद्र शाळेच्या श्रीमती सोनवणे मॅडम यांनी तर प्रमुख अतिथी कन्या शाळेच्या पवार मॅडम यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व थोर युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

अतिशय सुंदर अशा छोटया जिजाऊ व स्वामी विवेकानंद वेशभूषेत मोठया संख्येने चिमुकल्या विद्यार्थी /विद्यार्थिनीनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती मिसाळ मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विद्यार्थिनींनी “अतिशय सुंदर समूहनृत्यातून जिजाऊ वंदना सादरीकरण केली.त्यानंतर जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषा सादरीकरण झाले. त्यानंतर वर्ग 1ते 4 विद्यार्थी /विद्यार्थिनींची मराठी व इंग्लिश मधून भाषणे झाली.त्यानंतर चि. स्वराजने राजमाता जिजाऊंच्या कार्याचे गुणगान करणारे गीत गायन केले.

सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात श्रीमती मिसाळ मॅडम यांनी “राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद जीवन कार्यावर “प्रकाश टाकणारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शक मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी शिक्षणप्रेमी पालकांची देखील उपस्थिती लाभली होती. या सुंदर आणि बहारदार “राष्ट्रमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती “कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्रीमती. जोशी मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती बादाडे मॅडम यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आमच्या शाळेतील सोनवणे मॅडम, जोशी मॅडम, मिसाळ मॅडम,पवार मॅडम,बादाडे मॅडम,भोपळे मॅडम, क्षीरसागर मॅडम,कविता पुरी मॅडम, दहितूले मॅडम,चव्हाण मॅडम आणि शिंदे मामा. लाडके विद्यार्थी /विद्यार्थिनी व त्यांचे पालकांचे सहकार्य, सुंदर नियोजन आणि अथक परिश्रमामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 4 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे