भारतीय आदिम जाती सेवक संघ, विदर्भ नागपूर – FSW TI युनिट 1 तर्फे महिलादिन उत्साहात
नागपूर शहर प्रतिनिधी
भारतीय आदिम जाती सेवक संघ, विदर्भ नागपूर – FSW TI युनिट 1 तर्फे महिलादिन उत्साहात
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज मिडीया
नागपूर: (दि ११) शहरात मंगळवारी 10 मार्च रोजी, भारतीय आदिम जाती सेवक संघ, विदर्भ नागपूर (FSW TI युनिट 1) तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आनंदाने पार पडला. कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी पाहुणे म्हणून नंदनवन पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक प्रतीक्षा पाटील उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मनोगतात महिलांना महिला दिनाचे महत्त्व पटवून सांगितले.
तसेच महिलांनी कोणत्याही अन्यायाविरुद्ध धैर्याने लढा दिला पाहिजे असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे प्रकल्प संचालक विजय शेंडे यांनी उपस्थितांना चांगल्या आरोग्याचे महत्त्व समजावून सांगितले. संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. दिपाली खोबरागडे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन का साजरा केला जातो याबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाला DPO सौ. तनुजा फळे, तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, ICTC व DSRC काउन्सिलर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट मॅनेजर किरण निनावे, समुपदेशिका वैशाली लांबट, तनुजा महाजन (MEA) तसेच सर्व प्रकल्प कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमा दरम्यान काही महिलांनी सुंदर नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाच्या सरते शेवटी मयुरी यांनी उपस्थित सर्व मान्यवर व सहभागींचे आभार मानले. हा कार्यक्रम महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देणारा व प्रेरणादायी ठरला.



