Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

अखंड प्रकाश देणा-या दीपाप्रमाणे एखादे कार्य हजारोंसाठी प्रेरणादायी ठरते”; सुहासजी हिरेमठ

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

0 4 8 2 9 4

अखंड प्रकाश देणा-या दीपाप्रमाणे एखादे कार्य हजारोंसाठी प्रेरणादायी ठरते”; सुहासजी हिरेमठ

प्रदीप नाईक यांचा पंच्याहत्तरी निमित्त कृतज्ञता सोहळा

अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे

पुणे-दि.26(प्रतिनिधी) सामाजिक वांधिलकी मानून प्रदीर्घ काळ समर्पित सेवा कार्य करणा-या अनेक कार्यकर्त्यांना प्रदीप नाईक यांचे शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि.सामाजिक त्रेत्रातील कार्य हे एखाद्या दीस्तंभाप्रमाणे दिशा दर्शक असून हजारोंसाठी प्रेरणादायी ठरेल, असेच आहे” असे गौरवपूर्ण प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. सुहासजी हिरेमठ यांनी प्रदीप नाईक पंच्याहत्तरी कृतज्ञता सोहळ्यात बोलताना मांडले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष, व्हिजन इंग्लीश मिडियम स्कूलचे संस्थापक संचालक आणि एरवडा भागाचे माजी संघचालक श्री. प्रदीप लक्ष्मीकांत नाईक यांच्या पंच्याहत्तरीचे औचित्य साधून हा सोहळा येरवडा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

व्यासपीठावर लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष,दिपक पायगुडे, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष जेष्ठ विधिज्ञ एस. के. जैन, अमृत महोत्सव स्वागत समितीचे अध्यक्ष सागर ढोले पाटील हे मान्यव उपस्थित होते. येरवडा ते वाघोली परिसरातील संघाचे कार्यकर्ते व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने श्री. नाईक यांचा शाल श्रीफळ, पुणेरी पगडी व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तर सत्कारमूर्ती प्रदीप नाईक यांनी वैयक्तीक रित्या चार सामाजिक संस्थांना प्रत्येकी 1 लाख रूपये असा सहयोनिधी अर्पण केला.

मोलाचे, विधायक सामाजिक कार्य करणा-या या चार संस्था म्हणजे, फुलगाव येथील “ईश्वरपूरम” पूर्वांचल विद्यार्थी वसतिगृह, पर्वती भागातील “कौशिक आश्रम”, “बाळासाहेब देवरस रुग्णालय, पुणे” आणि येरवडा येथील “सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प” . या संस्थांच्या प्रतिनिधींनी हा देणगी निधी स्वीकारला. दीप प्रजवलन करून या हृद्य कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. संयोजकांच्या वतीने मान्यवर निमंत्रितांचे आणि स्वागत समिती सदस्यांचे सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमात व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. ॲड. एस के जैन याप्रसंगी बोलताना म्हणाले, प्रदीप नाईक यांनी
येरवडा ते वाघोली या परिसरात आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला असून विविध क्षेत्रात मोठे व्यापक कार्य ऊभे करताना व्यापक जनसंपर्कातून हजारो कार्यकर्ते जोडले. त्यांच्या कार्याचा दीप असाच सदैव तेवत राहो”. यानंतर माजी आमदार व सामाजिक कार्यकर्ते दीपक पायगुडे यांनी आण्णांच्या कार्याचा गौरव करून येरवडा व वडगाव शेरी परिसरात सेवा कार्याचे अनेक प्रेरक व रंजक किस्से सांगितले.

सत्कारमूर्ती प्रदीप नाईक यांनी आपले भावपूर्ण मनोगत व्यक्त करताना म्हटले की, ” आजचा गौरव माझा नसून या भागातील सर्व कार्रकर्त्याचा आहे, ते नसते तर मी इतका कार्यविस्तार करू शकलो नसतो, म्हणून माझा हा सत्कार सर्व कार्यकर्त्यांनाच अर्पण करतो, असे सांगून त्यांनी सुरवातीपासून साथ देणा-या जुन्या कार्यकर्त्यांच्या आणि काही दिवंगत मित्रांच्या हळव्या आठवणी जागवल्या.

कार्यक्रमात सागर ढोले पाटील, सौ. सुधा नाईक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रदीप नाईक यांचा जीवनपट स सेवाकार्य दर्शवणारी एक चित्रफित दाखवण्यात आली. “मातृमंदिरका समर्पित दीप मै”… हे गीत उपेंद्र तेरडाळ यांनी फादर केले. सूत्रसंचालन – नितीन तारे यांनी केले. ॲड.अशोक पलांडे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्माची सांगता झाली.

कार्यक्रमास अनेक प्रतिष्ठीत मान्यवर, संघाचे विविध पदाधिकारी यांच्यासह विश्रांतवाडी, वडगाव शेरी वाघोली येथून शेकडो कार्यकर्ते कुटूंबियांसह उपस्थित होते. श्री. कृष्णकांत सातव, श्री. श्रीकांत मल्लारेड्डी, महेश कर्पे, मंगेश कुलकर्णी यांच्यासह येरवडा ते वाघोली परिसरातील जुन्या नव्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे या कृतज्ञता सोहळ्याच्या यशस्वितेसाठी विशेष परीश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे