Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

अंबाझरी महावितरण कार्यालयात “मसन्या उद” आढळला

गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी

0 5 1 6 5 4

अंबाझरी महावितरण कार्यालयात “मसन्या उद” आढळला

सर्पमित्रांनी सुरक्षित पकडून सेमिनरी हिल्समध्ये सोडले

गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

हिंगणा/नागपूर : (दि १०) नागपूर शहरात दिनांक ८ मार्च २०२६ रोजी अंबाझरी येथील ८ वा मैल वाडी अंबाझरी नागपूर लो डिस्पॅच सेंटर, महावितरण कार्यालयात अचानक एक अनोखा प्राणी दिसल्याने काही काळ कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. एका व्यक्तीने पायरी चढत असताना वर हालचाल दिसल्याने जवळ जाऊन पाहिले असता त्याला “मसन्या उद” (Civet) दिसला.

ही माहिती मिळताच कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनाही बोलावण्यात आले. प्राणी पाहून कर्मचारी काहीसे घाबरले. त्यानंतर तत्काळ सर्पमित्र आशिष मेश्राम, आकाश मेश्राम, आदित्य वाडबुधे आणि रोहन भट यांना फोन करून माहिती देण्यात आली.

सर्पमित्रांची टीम अवघ्या दहा मिनिटांत घटनास्थळी पोहोचली आणि अत्यंत काळजीपूर्वक त्या प्राण्याला पकडले. त्यानंतर वन्यजीव सुरक्षिततेच्या दृष्टीने सेमिनरी हिल्स, नागपूर येथील TTC केंद्रात त्याला स्वाधीन करण्यात आले.

या घटनेमुळे काही काळ परिसरात उत्सुकता निर्माण झाली होती. सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी न होता प्राण्याला सुरक्षितपणे पकडण्यात यश आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे