“त्रिवार ऋणनिर्देश” मराठीचे शिलेदार समूहापस अर्पण; बळवंत डावकरे
श्री बळवंत शेषेराव डावकरे मुखेड जिल्हा नांदेड

“त्रिवार ऋणनिर्देश” मराठीचे शिलेदार समूहापस अर्पण; बळवंत डावकरे
‘मराठीचे शिलेदार’ समूहात आयोजित दि. ११/३ काव्यरचना ‘साहित्यसेवा’ दि. १५/३ त्रिवेणी ‘फसवू नको’ व दि. २७/३ काव्यरत्न चारोळी ‘रामोत्सव’ अशा तीनही सर्वोत्कृष्ट बहुमानाचे एकत्रित ऋणनिर्देश मांडताना प्रथमतः सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो.कौटुंबिक अडचणीत असल्यामुळे सर्वांचे ऋण व्यक्त करता आले नाही.
माणसाच्या मागे अडचणीचा ससेमिरा लागल्यावर कशी अवस्था होते, याची प्रचिती या पंधरवड्यात मला अनुभवायला मिळाली.मग तुम्हाला वाटेल की, ‘फोटो कसा पाठवला’? तर आपल्या मागील असलेले संकट राहुल भाऊस माहितच नाही… आणि मी कल्पना पण दिली नाही. मग आपल्यासाठी ते एवढे कष्ट उचलतात त्यांना मनस्ताप नको म्हणून फोटो पाठवला बघा…. असो, आपण मला समजून घ्यालच…!
आज सकाळी भाऊचा ‘तुमचा फोटो पाठवा’ हा संदेश वाचला व लगेच दिला पाठवून… माझी रामोत्सव ही काव्यरत्न चारोळी सर्वोत्कृष्ट म्हणून मिरवायलला लागली व या दु:खी मनाला सुखाचा गारवा भेटल्यासारखा झाला व मन हलके झाले.
“साहित्यसेवा” काव्यरचना ही मी करत असलेल्या लिखानास मिळालेली अनमोल अशी भेटच होती. या पामरास साहित्याच्या वाटेवर आणून वेडेवाकडे चालत असताना माझा हात पकडून सरळमार्गी चालायला लावणारे शिलेदार समुहाचे सर्वेसर्वा राहुलभाऊसह सर्व सदस्य यांच्यामुळेच हे शक्य….!!
“फसवू नको” ही त्रिवेणी सर्वोत्कृष्ट ठरली खरी, पण ऋणनिर्देश राहिले. माझे मनच मला म्हणायला लागले की, ‘फसवू नको’. रामनवमीच्या पावन दिनी माझी ‘रामोत्सव’ ही काव्यरत्न चारोळी सर्वोत्कृष्ट ठरली व जणू मजला लेखनरुपी श्रीराम प्रसादच मिळाला असे वाटायला लागले.
हे सर्व ज्यांच्यामुळे शक्य झाले असे ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा राहुल भाऊ, माझ्यावर बहिणीची माया लावणारी सविताताई, तारकताई, वृंदाताई, स्वातीताई, विष्णूदादा, संग्रामदादा, प्रशांत भाऊजी, शर्मिलाताई यासह माझ्या मनाला वेळोवेळी उभारी देणारे शिलेदार समूहातील सर्व सदस्य यांचे हृदयस्थ आभार मानतो.
श्री बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
©सदस्य मराठीचे शिलेदार समूह



