आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरमराठवाडाविदर्भसाहित्यगंध
परोपकारी
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0
5
1
7
8
7
परोपकारी
असा कोण आहे येथे
जो आजन्म परोपकारी
झाड त्याचे नाव आहे
जो जीवांचा हितकारी.. //
गंधीत फुले,चविष्ट फळे
भर उन्हात गार सावली
जसा माथ्यावर मायेचा
पदर धरते मायमाऊली…//
कैक संसाराचा आधार
पक्ष्याचे हे निवासस्थान
घरट्यात पिल्ले सुरक्षित
झाड वागते पित्यासमान.. //
मोफत पुरवते प्राणवायू
शत्रू मित्र सारेच समान
मुळे, फळे, पाला सुद्धा
जपे औषधी गुण महान.. //
ओली पालवी चारा होई
सुकल्या फांद्या सरपण
कोण इतका परोपकारी
उभ्या आयुष्य समर्पण.. //
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
0
5
1
7
8
7



