Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनवी दिल्लीपुणेमुंबई

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त!

वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे

0 4 8 2 9 4

डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त!

वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे

पुणे:(दि.११): आंतरराष्ट्रीय कीर्तिचे एकपात्री कलाकार , गायक शीळवादक, विचारवंत सबकुछ सर डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना नुकताच इंटरनॅशनल आर्टस क्रिएशन, सिडने तर्फे आंतरराष्ट्रीय कला अभ्यासक श्रीमती मधुरा यांच्या शुभहस्ते ऑनलाईन ‘इंटरनॅशनल सुपरस्टार ॲवाॅर्ड.2024 ‘ प्राप्त झाला.

अध्यक्षस्थानी वसुधा इंटरनॅशनलच्या अध्यक्ष सौ.वसुधा नाईक होत्या. ‘डाॅ.मधुसूदन घाणेकर हे 1963 पासून एकपात्री कला क्षेत्रात आहेत. त्यांनी 1998 ते 2024 या 26 वर्षाच्या काळात भारतासह नेपाळ-न्यूझीलंड श्रीलंका-सिंगापूर-मलेशिया-थायलंड दुबई-माॅरिशस व्हिएतनाम-कंबोडिया – चीन – रशिया – सिंगापूर -मलेशिया – थायलंड – भूतान -आदि 20 देशात त्यांच्या विनाप्रायोजक विश्वजोडो अभियानासह चालता बोलता हिंडता फिरता असे ‘ सबकुछ.मधुसूदन ‘ एकपात्री कार्यक्रमाचे हजारो
प्रयोग विनामूल्य केले.

भेटेल त्या देशी विदेशी रसिकास मानवता धर्म श्रेष्ठ धर्म, रक्तदान-नेत्रदान-अवयवदान देहदान करा, हसा:जग जिंका, दिव्यांग-वंचित-गरिब यांना सहकार्य करा, प्राणी-पक्षी निसर्ग यावर प्रेम करा आदि संदेश तर दिलेच.तसेच जन्मतारीख-चेहरा- हात यावरुन भविष्य कथन, सहीवरुन तात्काळ सही सही सकारात्मक स्वभावदर्शन शीळवादन, जुनी गाणी म्हणून दाखवणे, मिमिक्री, किस्से या माध्यमातून विनामूल्य मनोरंजन केले.तसेच निखळ हसणा-या पर्यटकांना तात्काळ हाहाहाsssलाफ इंटरनॅशनल ॲवार्ड सर्टिफिकेट्स दिली. हे त्यांचे कार्य निश्चितच गौरवास्पद असून सा-या दुनियेत असे योगदान देणारे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्यासारखे व्यक्तिमत्व दुर्मिळच !’ असे गौरवोद्गार याप्रसंगी आंतरराष्ट्रीय कला अभ्यासक श्रीमती मधुरा यांनी काढले.याप्रसंगी सौ.वसुधा नाईक यांनीही अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.भेटणा-या प्रत्येक चांगली व्यक्ती आपल्या यशाची वाटेकरी असल्याचे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे