
0
5
1
7
8
7
अभिजात मराठी
माझ्या मायेच्या उदरी
दडे कस्तुरीचा गंध
लागे प्रत्येक मनोमनी
माझ्या मराठीचा छंद ॥१॥
श्रेष्ठता मराठीची
असे अतिप्राचीन
दुर्लभ ते ज्ञान किती
लेती अलंकार मोहक ॥२॥
कधी झुलवी हर्षात
कधी आणी डोळा पाणी
गाती कर्तृत्व, धाडस
शेला अंगी सप्तरंगी ॥३॥
समृद्ध वारसा परपंरेचा
चतुर्वेदांत जीवनाचा गाभा
माय मराठीचा अमूल्य ठेवा
जणू चकाके हिर्याची आभा॥४॥
मायेच्या साहित्याची
लेखणीला येवो धार
स्फुर्ती, वैभवाची गाणी
जणू फुटे मायेचा पाझर ॥५॥
सौ. सुपेकर कल्पना
जि.अहिल्यानगर
0
5
1
7
8
7



