
0
4
8
2
8
6
तुझ्याच मनातील
शब्दाविना कळू लागले, तुझ्या मनातील भाव
वेडं मन तुझ्या ओढीने, मग घेवू लागले धाव
तुला डोळाभर बघण्याचा, जीवास जडला छंद
आस तूझ्या भेटीची, करते मनास बेधुंद
मन आतुर भेटीसाठी, एकांतात कातरवेळी
पण लागेना चाहूल तुझी, ओल्या त्या सांजवेळी
कधी कळणार तुला गं, तुझ्याच मनातील भाव
सांग सखे काय देवू, नात्याला आपुल्या नाव
माझ्या जीवन प्रवासात, मज हवाय तुझा संग
काळजावर चढू लागलाय, तुझाच प्रेम रंग.
सौ इंदू मुडे,
ब्रम्हपुरी, चंद्रपूर
0
4
8
2
8
6



