‘मराठीचे शिलेदार’ समूहाप्रती आभाराची शब्दसुमने; वनिता गभने
".... आणि मनाने मनालाच मनातच हायसे केले."

‘मराठीचे शिलेदार’ समूहाप्रती आभाराची शब्दसुमने; वनिता गभने
“…. आणि मनाने मनालाच मनातच हायसे केले.”
“सर्वोत्कृष्टच्या मानाचा
मिळाला बोजारा खास..,
कृतज्ञभावे समूहास अर्पिते
शब्दसुमनांची निर्मळ रास..”
आजकाल तब्येतीची कुरबुर आणि मुलीसाठी सुरू असलेला जावई शोध यामुळे लेखण वाचनापासून मी अलिप्तच झाली होती. मनात कामाची, विचारांची कितीही वर्दळ असली तरी, कुठेना कुठे मनाचा एक कोपारा लेखणी वाचून रिता होताच; आणि हा रितेपणा मनाला बोचतही तितकाच होता. काल खूप दिवसानंतर जरा निवांत वेळ मिळाला. विषय जरा सोपे वाटले. मग रितेपणा भरून काढण्यासाठी उचलली लेखणी लावली समूहाला. स्वामी कृपेने सर्व समूहात लिखाणही सहज शक्य झाले. आणि मग कुठे मनाने मनालाच मनातच हायसे केले.
काल खरेच गमावलेले पुन्हा एकदा कमावल्याचा आनंद झाला; आणि या आनंदात शर्कराचा गोडवा आज सर्वोत्कृष्ट सन्मानाने दिला. हा सन्मान म्हणजे, ‘ पोळ्याच्या पाडव्याचा बोजारा’, आजवरचा सर्वात अनमोल ‘बोजारा’. यासाठी शिलेदार माहेरची आजन्मच ऋणी मी.
“इथेच शिकले लिहायला
इथेच सावरले मी स्वतःला,
मिळाला गोतावळा ऋणानुबंधांचा
ज्यांनी धीर दिला या हाताला..”
या शिलेदार माहेरच्या कृतज्ञभावात व्यक्त व्हावे तेवढे कमीच. आज माझ्या,’ घेऊन जा गे मारबत’, या रचनेला सर्वोत्कृष्टाचा सन्मान देऊन गौरवण्यात आल्याबद्दल, समूहासाठी जीवतोड मेहनत करणारे आ. राहुल सर, समूहाच्या अज्ञात जीवनस्त्रोत आ. पल्लवी ताईसो, समूहाच्या सदस्यांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आ. सविता ताईसो, आ. स्वाती ताईसो, आ. तारका ताईसो, आ. शर्मिला ताईसो, आ. वृंदा ताईसो, आ. प्रतिमा ताईसो समूहावर जीव ओवाळून टाकणारे आ. विष्णू दादासाहेब, आ. प्रशांत दादासाहेब, आ. कुमठेकर सर, आ, लांडगे सर, सर्व प्रशासक, सहप्रशासक, परीक्षकांची मी खूप खूप ऋणी आहे. समूहातील सर्व ताई दादा माझ्या लेखणीला दाद देऊन शुभेच्छाचा वर्षाव करून मला प्रोत्साहित करतात त्या सर्वांचीच मी खूप खूप आभारी आहे.
सौ वनिता गभणे
आसगाव, जि.भंडारा
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह



