Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनगोंदियानागपूरविदर्भसाहित्यगंध

‘कवितेवर बोलू काही’ गुगल ऑनलाईन बैठकीत नामवंत साहित्यिकांचा सहभाग

मराठीचे शिलेदार संस्थाध्यक्ष करणार आजपासून कार्यवाही

0 4 8 2 9 0

‘कवितेवर बोलू काही’ गुगल ऑनलाईन बैठकीत नामवंत साहित्यिकांचा सहभाग

झाली आचार विचारांची देवाण-घेवाण

सर्वांच्या मतांच्या विचाराअंती एकमताने कार्यक्रम आयोजनाचं नियोजन

मराठीचे शिलेदार संस्थाध्यक्ष करणार आजपासून कार्यवाही

तारका रूखमोडे
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया

गोंदिया/नागपूर: दिनांक २४ फेब्रुवारीला मराठीचे शिलेदार संस्थेतर्फे ‘कवितेवर बोलू काही’ या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंबंधी गुगल ऑनलाइन मिटींगद्वारे चर्चा ठेवण्यात आली होती. साहित्यक्षेत्रातील साहित्यपूजक साहित्य प्रेमींनी तथा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यात आवर्जून सहभाग घेतला होता.

संध्यासमयी ठिक ८ वाजता ही ऑनलाईन मिटींग संस्थाध्यक्ष राहुल पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य परीक्षक कार्यकारी संपादक सविता पाटील ठाकरे यांच्या विशेष, उपस्थितीत सुरू झाली. त्यात साहित्यक्षेत्रात तथा सिनेक्षेत्रात नावाजलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राजक्ता खांडेकर नागपूर, नितेश सर, व्हिडिओ जर्नालिस्ट रजत डेकाटे, सहप्रशासक प्रा. तारका रुखमोडे गोंदिया,बि.एस. गायकवाड परभणी, सुरेखा चित्ते रायगड, शीला रोडे,पंकज येवले, मोहिनी निनावे नागपूर, मायावती गायकवाड इ. नी आवर्जून भाग घेतला.प्रशासक सविता पाटील ठाकरे यांनी स्वपरिचय देत उपस्थित सर्व साहित्यिकांचे स्वागत केले व संस्थेचा बैठकीमागील उद्देश स्पष्ट केला.

सर्वांनी आपापला परिचय देत चर्चेत सहभागी झालेत. चर्चेतून कार्यक्रमाच्या नियोजन बाबतीत अनेक पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात तब्बल एक तास विचारविमर्श करण्यात आला. व २ मार्च ही तारीख पक्की करण्यात आली.

राहुल पाटील सर यांनी विदर्भातील कवीने दिल्लीच्या व्यासपीठावरही जावं हा आमचा मानस आहे. तसेच याद्वारे जे वाचकवर्ग व साहित्य प्रेमी आहेत त्यांनाही दुसऱ्या नावाजलेल्या कवींची कविता सादरीकरणाची संधी दिली जाईल.. हा एक अभिनव प्रयोग करण्याचा मानस असल्याचं मत त्यांनी मांडलं.

या अभिनव प्रयोगामुळे नक्कीच वाचनसंस्कृती वाढेल असे मत प्राजक्ता खांडेकर यांनी मांडलं व या प्रयोगाची सराहना केली. हा नवा प्रयोगशील विचार स्पृहणीय आहे याद्वारे मराठी मनाचा आत्मविश्वास वाढेल व भाषा समृद्धी होईल असे मत प्रा. तारका रुखमोडे यांनी मांडले. तर सहभागी सर्व सारस्वतांनी वैदर्भीय तथा मराठवाडी तथा अन्य प्रांतीय साहित्यिकांच्या सरमिसळीतून हा कार्यक्रम नक्कीच फळास येईल व भाषा सक्षमीकरणाच्या उद्देश पूर्तीसाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे, असे आपापले बहुमूल्य विचार व मते मांडले.

कार्यक्रमाच्या हेतूपूर्तीसाठी आगामी साहित्य सोहळ्यात सर्व घटकातील साहित्यप्रेमींनी, विद्यार्थी ते समस्त वाचकवर्गानेही यात सामिल व्हावे असे आवाहन अध्यक्ष राहुल पाटील सर यांनी केले.. सर्व उपस्थितांचे सविता पाटील यांनी आभार मानले. अशाप्रकारे मराठीचे शिलेदार समूहाच्या या पहिल्याच गुगल मिटींगची उद्देशपूर्ती सफल झाली. सर्वांनी उपस्थित राहून भाषा सक्षमीकरणाचा तथा संवर्धनाचा हा यज्ञ सफल करावा ही विनंती.

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे