Breaking
आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीचंद्रपूरनागपूरब्रेकिंगमहाराष्ट्रविदर्भ

‘भद्रावती तालुक्यात रेती घाटातून रेती तस्करी’; महसूल विभागाची निष्क्रियता उघडकीस

पवन जिवतोडे माजरी प्रतिनिधी

0 5 5 8 5 4

‘भद्रावती तालुक्यात रेती घाटातून रेती तस्करी’; महसूल विभागाची निष्क्रियता उघडकीस

मंडळ अधिकाऱ्यांची माहिती देण्यासाठी टाळाटाळ..!

पवन जिवतोडे
माजरी प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

चंद्रपूर: ( दि २०) जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात लिलाव झालेल्या व लिलाव न झालेल्या अनेक घाटातून दिवस रात्रौ रेतीचा अवैध उपसा सुरु असून लिलाव झालेल्या पिपरी देशमुख, तसेच लिलाव न झालेल्या माजरी परिसरातील वर्धा नदीपत्रातून राळेगाव, मणगाव, पाटाळा, घाटातून बिनदिक्कत रेती उपसा सुरु असल्यामुळे घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना रेती मिळण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत आहे.

दरम्यान घरकुल योजनेसाठी गरीब व गरजू लोकांना पिपरी घाटातून रेती दिल्या जाईल असे सांगण्यात येते आहे. मात्र त्यांना या घाटातून रेती आणण्यासाठी प्रवास खर्च चार ते पाच हजार रुपये लागत असल्यामुळे कुणीही घरकुल लाभार्थी ही रेती घेणास तयार नाही. दरम्यान स्थानिक व जवळच्या वर्धा नदीपत्राची रेती चोरट्यासाठी खुली असून शासकीय नियमानुसार घरकुल लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या पाच ब्रास रेतीसाठी रेती तस्कर वाजवी पेक्षा जास्त रक्कम घेत आहेत.

भद्रावती तालुक्यातील अवैद्य रेती तस्करांनी उच्छाद मांडलाय बिना लिलाव असलेल्या रेतीघाटावर रेती तस्करांनी रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरु आहे. विशेष म्हणजे मुख्य मार्गावरून रेती तस्करी होत असताना सुद्धा स्थानिक प्रशासनाने कोणतीही कारवाई करत नसल्याने तस्करांना प्रशासनाला मूक संमती आहे का असा संतप्त सवाल भद्रावती तालुक्यातील नागरिक करीत आहे. 

”भद्रावती तालुक्यातील खासगी व शासकीय बांधकामातील वेग घेतला आहे. ज्या घाटातून अधिकृत लिलाव झालेले नाही, त्या घाटात रेतीचा पुरवठा सर्रासपणे सुरू आहे. रेती तस्करांची हिम्मत वाढल्याने रेती तस्करी जोमात सुरू आहे मात्र प्रशासन कोमात दिसल्याचे चित्र दिसत आहे. महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांच्या सुस्त कारभारामुळे रेती तस्कर मालामाल होत आहे तर दुसरीकडे शासनाचा करोडोच्या महसूल बुडत आहे अनेक ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामावर अवैद्य रेतीचे साठे दिसून येत आहे तस्करांच्या या वाढत्या शीर जोरीमुळे गौणखणीजाची लूट होत आहे व पर्यावरणाच्या ऱ्हास होत आहे.

अवैध  खनिजाचे लूटमारीचे प्रकरण तालुक्यात चर्चेच्या विषय आहे. केवळ नावापुरती कारवाई न करता या तस्करांच्या मुळावर घाव घालण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जातीने लक्ष घालने गरजेचे झाले आहे तस्कराविरुद्ध कठोर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.

मंडळ अधिकारी यांची भूमिका अस्पष्ट

पिपरी येथील घाटाबद्दल विचारपूस करण्यासाठी येथील मंडळ अधिकारी गणपुरवार मॅडम व ठाकूर मॅडम पठवारी माजरी यांना फोन केला असता सुरुवातीला फोन उचलून उडवा उडवीचे उत्तर दिले दरम्यान पुन्हा संपर्क साधला असता फोन उचलत नसल्याने कोणतीच माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.

राजेश भांडारकर तहसीलदार भद्रावती

भद्रावती तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी सर्व पोलीस अधिकारी व मंडळ अधिकारी यांची बैठक मागील आठवड्यात तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली व शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत व अतिशय कडक कारवाई करण्यात येऊन केलेल्या कारवाईचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 5 8 5 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे