अॅड.उमाकांत आदमाने यांना “महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४”
वकिली व्यवसाय ते साहित्य प्रवास
अॅड.उमाकांत आदमाने यांना “महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४”
पुणे: सत्यशोधक सामाजिक फाउंडेशन, सर्च फाउंडेशन आणि युवा प्रबोधन साहित्य मंच यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०२ जून २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालधक्का चौक पुणे येथील सभागृहात विविध क्षेत्रात कार्य करणा-या कर्तुत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा केला गेला होता. प्रसंगी साहित्यिक अॅड. उमाकांत मधुकर आदमाने यांच्या सामाजिक, वकिली क्षेत्रातील काम पाहता त्यांना संस्थेच्या वतीने उद्घाटक मा. एक्स पैरा कमांडो मा. रघुनाथ सावंत, स्पेशल फोर्स ऑप हिफाजत, ब्लू स्टार पवन रक्षक (अध्यक्ष डिफेन्स फोर्स लीग) अध्यक्ष मा. सीमाताई राउत, (माईकट्टा महाराष्ट्र राज्य साहित्य प्रतिष्टान नागपूर), स्वागताध्यक्ष मा. नीता संजय शेळके – कोटगिरे (वकील उच्च न्यायालय, नागपूर) इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन मोठ्या उत्साहाने महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला.
अॅड. उमाकांत मधुकर आदमाने हे सध्या शिवाजीनगर, जिल्हा सत्र न्यायालयात पुणे येथे वकिली व्यवसायाबरोबरच नोटरीचे देखील काम करतात त्यांची आणखी नवी ओळख म्हणजे सुंदर कवी, लेखक, साहित्यीक व सामाजिक बांधिलकी जपत आहेत त्यांनी आगामी काळात खुप सुंदर विवध विषयावर कविता सादर करून कवी रसिकांची मने जिंकली, अॅड.उमाकांत आदमाने हे नुकतेच नोटरी झाले असले कारणाने वकिली व्यवसाया बरोबरच त्यांनी लॉकडाऊनच्या काळात कवितेचा यशस्वी प्रवास करत साहित्य क्षेत्रात देखील आपला ठसा प्रामाणिकपणे उमटविला आहे.
अनेक राजस्तरीय, जिल्हास्तरीय, विविध काव्यसंमेलनात सहभाग घेऊन त्यांना साहित्य क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रम आणि अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत, तसेच सामाजिक बांधिलकी जपत राज्य शासनाने त्यांची दखल घेत सामाजिक पुरस्कार सुद्धा बहाल केले राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट स्वयंसेवक राज्य पुरस्कार’ मुंबई २००८-०९, व महाराष्ट्र शासनाचा ‘विशेष सामाजिक कार्य पुरस्कार’ लातूर २०१२ प्राप्त झाला आहे. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात कवितेचा यशस्वी प्रवास करत साहित्य क्षेत्रात देखील आपला ठसा प्रामाणिकपणे उमटविला आहे, अनेक राजस्तरीय, जिल्हास्तरीय, विविध काव्यसंमेलनात सहभाग घेऊन त्यांना साहित्य क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रम आणि अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.
सध्या भूषवत असलेली पदे, आखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद, प्रदेशाध्यक्ष, पुणे शहर, प्रतिष्टीत कलावंत प्रतिष्ठान, अध्यक्ष पुणे जिल्हा, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्था, पुणे कायदेविषयक सल्लागार, कल्पतरू कलापथक, राष्ट्रीय एकात्मता पुणे कायदेविषयक सल्लागार, साहित्य सम्राट, पुणे सभासद.



