महाराष्ट्र माझा
या भारतात गुंजतो आता,हा डंका किर्तिबाजा।
जय जय महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा।।
महाराष्ट्राची आम्ही लेकरे मराठी आमची मायबोली।
संतांच्या अम्रुतवाणीने धरणी, सारी झाली चिंबओली ।।
शिवरायाला नमतो सगळे, न्यायिक रयतेचा आम्हांराजा ..
जय जय महाराष्ट्र माझा..
व्रुक्षवेल्ली डोंगर नद्या, हिरवाईने सजूनी शेतशिवार।
सह्याद्रीला अंतरी हाक मारुनिया ,वंदती गोदाईला त्रिवार।।
क्रांतिकारक शाहीर झाले,उघडूनी श्रीरामाचा दरवाजा …
जय जय महाराष्ट्र माझा..
एका दिलाने एक होऊनी,राहतो आम्ही महाराष्ट्रात
कमी कशाची मुळीच नाही, आम्ही आहो आनंदात।।
जात धर्म पंथ वेगळे,समानतेचा मनामनात शुद्धभाव ताजा…
जय जय महाराष्ट्र माझा..
विदर्भात खनीज खजिना, मराठवाडा सांगे इतिहास प्रेरणा।
कोकणी गोजीरे मनोहर,पश्चिम दक्षिणी भक्तीची चेतना ।।
खान्देशी वसा जपतो ,साहित्य संस्कृती गाजावाजा….
जय जय महाराष्ट्र माझा..
गोवर्धन तेलंग
पांढरकवडा



