
0
4
8
2
8
4
आयुष्य हे
कधी ऊनही कोवळे हवेहवेसे
कधी नकोशी सावली थंडगार
कधी आकस्मात आनंदी वार्ता
आयुष्य हे वाटते गूढ फार फार…!!
किती प्रवासी भेटतात रोजच
आपणच आपले खरे साथीदार
टिचभर पोटासाठी एवढे काम
आयुष्य हे वाटते गूढ फार फार…!!
मायबाप सोडून सारे मतलबी
रक्ताचे नातेही संकटात पसार
विश्वासघातकी आपलेच सारे
आयुष्य हे वाटते गूढ फार फार…!!
सरड्यापेक्षा जास्त बदलतात
क्षणातच येथे आचार विचार
तोंडपूजा करून पाठीवर वार
आयुष्य हे वाटते गूढ फार फार…!!
रोज नवनवे प्रश्न सोडवताना
शक्ती युक्ती पणाला जाते पार
संवेदनशीलतेला वेदना हजार
आयुष्य हे वाटते गूढ फार फार…!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
0
4
8
2
8
4



