
0
4
0
9
0
3
तडजोड
नवी दिशा नवी आशा
हिच असावी भुमिका
जीवनात नको कधी
कोणाशी अहमहिका
जीवनाचा रंगमंच
जगण्यास अवघड
सुखदुःखाच्या प्रसंगी
करावीच तडजोड
अहंकार बाळगून
नको नात्याची नाचक्की
ऋणानुबंधाने जपू
नात्याची वीण पक्की
हमरीतुमरीने नोहे
मार्ग सुखी जीवनाचा
तडजोड साध्य करी
सुवर्णमध्य हर्षाचा
तडजोड जीवनात
दर्शवी भूमिका नेक
सक्षम होवू तारण्या
येती संकटं अनेक
दत्ता काजळे (‘ज्ञानाग्रज’)
तुरोरी जि.धाराशिव
========
0
4
0
9
0
3





