
0
4
0
9
0
3
क्षणांचे मोल
नका हो करू काळजी,
कुणाची वेळ द्या स्वतःला.
जगून घ्या स्वतःसाठी,
पुन्हा जीवन नसे तुम्हाला.
जेव्हा नव्हता तुम्ही तेव्हा,
जग नव्हतं असं नाही.
गेल्यावर देखील तुम्ही,
काही बिघडणार नाही.
का करता द्वेष कुणाचा,
ठेवा मित्रत्वाची भावना.
दवडू नका क्षण आनंदाचे,
दुखी ठेऊनिया मना.
संपत्तीच्या नको मागे,
काल नव्हती तुमची.
सोडावा लागेल विचार,
उद्या असणार दुसऱ्याची.
ठरवून दिलेले श्वास आहेत,
संपले की जातील निघून.
प्रत्येक श्वास देवाने दिलेला,
घ्या त्याला आनंदाने जगून.
डॉ. बालाजी राजूरकर
हिंगणघाट जि. वर्धा
========
0
4
0
9
0
3





