Breaking
नागपूरब्रेकिंगमहाराष्ट्रविदर्भ

उद्या विदर्भवाद्यांचा, विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा

नागपूर शहर प्रतिनीधी

0 4 8 2 8 2

उद्या विदर्भवाद्यांचा, विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा

चिटनीस पार्क महाल येथे विदर्भवाद्यादी दोन वाजतापासून होणार आक्रमक

नागपूर शहर प्रतिनीधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर: जय विदर्भ ! विदर्भ वेगळाच झाला पाहिजे ! आणि तो आम्ही मिळवणारच ! या घोषवाक्यातून मिशन 2027 अंतर्गत डिसेंबर 2027 पूर्वी स्वतंत्र विदर्भ मिळवणारच असे आवाहन करित ॲड. वामनराव चटप यांनी पत्रकारांना सांगितले की, विदर्भ राज्य आंदोलन समिती च्यावतीने रविवार दिनांक. 22 फेब्रुवारी रोजी, विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून शहीद चौक नागपूर येथून लॉंग मार्च निघणार आणि दुपारी 2 वाजता. चिटनीस पार्क महाल नागपूर येथे मेळावा संपन्न होणार आहेत.

या मेळाव्यामध्ये व लाँग मार्चमध्ये विदर्भातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ॲड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. विदर्भ राज्य वेगळा झाला पाहिजे स्वतंत्र विदर्भ राज्य ही काळाची गरज आहे. विदर्भापुढे गंभीर प्रश्न उभे असताना विदर्भातील सत्ताधारी पक्षाचे खासदार सत्ता असूनही विदर्भाचे स्वतंत्र राज्य मिळून देण्यात अपयशी ठरलेले आहे आणि विरोधी पक्षाचे खासदारही केंद्र सरकारला विदर्भ राज्य निर्माण करण्यास भाग पाडण्यात अपयशी ठरले आहे. म्हणून दहाही खासदारांनी आपले अपयश मान्य करून तात्काळ खासदार पदाची राजीनामे द्यावे. असे पत्रकारांना सांगितले.

या पत्रकार परिषदेमध्ये एड. वामनराव चटप, श्रीमती रंजनाताई मामर्डे, अरुण भाऊ केदार, सुनील चोखारे, मुकेश मासुरकर, तात्यासाहेब मते, ज्योतीताई खांडेकर, प्रशांत नखाते आणि नरेश निमजे यांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे