बाल कवी-कवयित्रींमधे दिसतात शांता शेळके, इंदिरा संत, पाडगावकर; डाॅ.मधुसूदन घाणेकर
वसुधा नाईक पुणे प्रतिनिधी
बाल कवी-कवयित्रींमधे दिसतात शांता शेळके, इंदिरा संत, पाडगावकर; डाॅ.मधुसूदन घाणेकर
वर्ल्ड पोएट्री पुरस्काराने कवी सन्मानित
वसुधा नाईक पुणे प्रतिनिधी
पुणे : (दि 15मार्च): आत्ताची जी 12..13 वर्षाची उमलती बाल कवी कवयित्रिंची पिढी आहे , त्यात उद्याचे शांता शेळके – इंदिरा संत-कुसुमाग्रज – मंगेश पाडगावकर पहायला मिळतात. 2035 ची कविता अधिक प्रगल्भ पहायला मिळावी हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन आत्ताच्या बाल कवी कवयित्रींना सातत्याने व्यासपीठ मिळावे या साठी ज्येष्ठ साहित्यिकांनी प्रयत्नशील रहावे ” असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी आणि वर्ल्ड पोएट्री संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले. संस्थेतर्फे नुकतेच “वर्ल्ड पोएट्री” हे निमंत्रितांचे काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते , या संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात डाॅ.मधुसूदन घाणेकर मार्गदर्शन करीत होते.
संमेलनाचे उदघाटन आंतरराष्ट्रीय पातळीवरील बालकवयित्री अजया मुळीक हिच्या हस्ते करण्यात आले. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते निमंत्रित कवी कवयित्रींना 2025 च्या वर्ल्ड पोएट्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा प्रिया दामले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कोवळ्या काव्य पिढीवर भारतीय संस्कृतीचा प्रभाव पहायले मिळणे हे निश्चितच साहित्य क्षेत्रातील भावी काळातील साहित्य क्षेत्राच्या उत्कर्षाचे संकेत आहेत असा सूर वर्ल्ड पोएट्री संमेलनातून निघाला. मला कवितेमुळे खुप आनंद मिळतो आणि कवितेचा ध्यास घेऊन मी अधिक चांगली कविता करेन असे बाल कवयित्री अजया मुळीक हीने संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी सांगितले.
वसुधा नाईक, अनघा सावनूर आगाशे, मंदाताई नाईक, सारिका सासवडे ,प्रीती दबडे, मनीषा ठाकूर, प्रतिमा काळे, दीपराणी गोसावी , भावना गुप्ता, बाबा ठाकूर, योगेश हरणे, गौरव पुंडे , विनोद अष्टूळ, शामला पंडित, धनंजय इंगळे ,श्रीराम घडे आदि 25 मान्यवर कवी कवयित्रींनी धुलीवंदनाची काव्यसंध्या रंगवली.
सारिका सासवडे यांनी आभार मानले. संमेलनाचे औचित्य साधून डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित विश्वविक्रमी ‘ डहाळी अनियतकालिकाच्या 670 व्या विशेषांकाचे प्रकाशन प्रिया दामले , अजया मुळीक, वसुधा नाईक, सारिका सासवडे, मंदाताई नाईक आदि मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. पैशाला नसते जात , पैशाला नसतो धर्म या अजया मुळीकच्या कवितेने उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. इंद्रधनुष्याला सात रंग पण मनाला हजार रंग या डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या कवितेने संमेलनाचा समारोप झाला.



