Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरब्रेकिंगमहाराष्ट्रविदर्भ

पिपरी (गोंडवाना )हे हिंगणा तालुक्यातील पहिले “सौरग्राम”; आमदार समीर मेघे यांच्या हस्ते उद्घाटन

गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी हिंगणा

0 5 7 3 4 6

पिपरी (गोंडवाना )हे हिंगणा तालुक्यातील पहिले “सौरग्राम”; आमदार समीर मेघे यांच्या हस्ते उद्घाटन

गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी हिंगणा

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर/ हिंगणा : (दि २३ जुलै) प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजनेंतर्गत हिंगणा तालुक्यातील खापरी गांधी ग्रामपंचायत मधील पिपरी (गोंडवाना ) गावाला पहिले “सौरग्राम” म्हणून विकसित करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने तसेच बुटीबोरी येथील कॅल्डरीज सोशल वेलफेअर ट्रस्टच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाला आहे.

या उपक्रमांतर्गत पिपरी गावातील प्रत्येक घरावर एक किलोवॅट क्षमतेची सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात आली असून, त्यासाठीचा खर्च प्रधानमंत्री सूर्यघर योजना, राज्य शासनाची स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना आणि सीएसआर निधीतून करण्यात आला आहे. या यंत्रणेमुळे गावातील कुटुंबांना स्वतःची वीज निर्मिती करता येणार असून, त्यांचे वीजबिल जवळपास शून्यावर येणार आहे. त्यामुळे पिपरी हे संपूर्णपणे सौरऊर्जेवर आधारित गाव ठरणार आहे.

या अभियानाचा उद्घाटन सोहळा गुरुवार, दि. २३ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता पिपरी येथे आमदार समीर मेघे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना आमदार मेघे यांनी महावितरणच्या सहकार्याने साकारलेला हा प्रकल्प अनुकरणीय असल्याचे सांगितले. तसेच हिंगणा तालुक्यातील दहा ते पंधरा लहान व अल्प उत्पन्न असलेल्या गावांमध्येही अशा प्रकारची योजना राबवून नागरिकांचे वीजबिल शून्यावर आणण्यासाठी महावितरणने आवश्यक मदत व मार्गदर्शन करावे, अशी विनंती त्यांनी केली.

या उद्घाटन सोहळ्याला जिल्हा परिषद नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक, अधीक्षक अभियंते प्रफुल्ल लांडे व स्वप्नील गोतमारे, इंडस्ट्रियल ऑपरेशन अँड प्रोजेक्ट्सचे संचालक सत्येंद्र कुमार, कॅल्डरीज रिफॅक्टरीजचे मुख्य व्यवस्थापक सुबोध दुबे, बीएमएचे अध्यक्ष खंडेलवाल, खापरी (गांधी)च्या सरपंच सौ. सरिता रविंद्र करनाके, आतीश उमरे, नाना शिंगारे, चंद्रभान इरपाते, तुषार लोखंडे, रामदास पुंड, वेदांत वासाडे तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 3 4 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे