
0
5
1
7
9
6
उधाण वाऱ्याचे
वेगाचे वेडं त्याला
तो नाही समाधानी
मन उधाण वाऱ्याचे
झेप घेई गगणी
धावे वायू वेगे वेगे
जाई खोल सागरी
घेईना जराही विसावा
स्वछंदी फुलंपाखरा परी
सागराहूनही खोल
अवकाशाहून मोठे
भुई,आकाश त्याला छोटे
त्याला शोधावे तरी कोठे
निसर्गाच्या सानिध्यात
त्याला आवडे बहरणे
शीळ घाली कानाशी
कळेना त्याचे कुजबुजने
मन उधाण वाऱ्याचे
त्याला कठीण आवरणे
फक्त बुध्दालाच जमले
त्याला काबूत ठेवणे.
इंदू मुडे
ब्रम्हपुरी, चंद्रपूर
0
5
1
7
9
6



