0
4
0
9
0
3
प्रेमवाणी
मादकतेचा गंध तुझा
सांगुनी गेला मजला..
दाहकतेचा संग माझा
झेपेल का गं तुजला..
कोसळशील का बाहूत
बनून नाजूक कर्दळ..
एकांत बघ खुणावतोय
पांगली आहे ही वर्दळ..
कर उधळण बहर अशी
नवा जोश घेऊन येशी..
डोळ्यांत ही किती मस्ती
वरून बटांची बदमाशी..
मौसमच हवा कशाला
येऊ दे ना अवेळी लाट..
अवसेला पुनवेचं स्वप्न
भरून वाह काठोकाठ..
अधीर हा भ्रमर राणी
कौमुदीत विसावण्याशी..
उमलेल बघ कळी न् कळी
चांदणराती तुझ्या कुशी..
चिंब भिजावी लाजेत तू
नकोय आता आणीबाणी..
प्राण आले कानात माझे
ऐकण्या तुझी प्रेमवाणी…
ऐकण्या तुझी प्रेमवाणी…
सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा,दा.न.ह.
मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह
0
4
0
9
0
3





