शेवटी… आ. संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल
तरीही मी माझ्या वक्तव्यावर ठाम; आ. संजय गायकवाड
शेवटी… आ. संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल
तरीही मी माझ्या वक्तव्यावर ठाम; आ. संजय गायकवाड
जय संविधान म्हणत काँग्रेसचे ठिय्या आंदोलन समाप्त
बुलढाणा : शेवटी आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार तासापेक्षा अधिक ठिय्या आंदोलन दिल्यानंतर पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेत काँग्रेसच्या आंदोलनाला विराम देण्याचा प्रयत्न केला.
एफ आय आर ची कॉपी हातात घेऊन मध्यप्रदेशचे माजी आमदार तसेच राज्याचे काँग्रेस प्रभारी कुणाल चौधरी यांनी जय संविधान म्हणत ठिय्या आंदोलन थांबविले. कलम 351(2,3,4) तसेच 192 अंतर्गत आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात फिर्यादी म्हणून समाधान पुंडलिक दामधर रा. जामोद, ता. जळगांव जामोद यांचे नाव आहे. ” गुन्हा दाखल झाला आहे परंतु आमदार संजय गायकवाड यांना अटक करण्यात आली नाही.
तर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या दिवशी काँग्रेसचा एक एक कार्यकर्ता घरातून बाहेर पडेल आणि आंदोलन करेल “, असा इशारा अ. भा. काँग्रेसचे युवा नेते कुणाल चौधरी यांनी मीडिया प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटून आणणाऱ्यास अकरा लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे वादग्रस्त विधान आमदार संजय गायकवाड यांनी केल्यानंतर काँग्रेसने सदर आंदोलन केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी का माफी मागावी माझे स्टेटमेंट आहे मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे.